आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 19 August 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:भारतात 20 लाख रुग्ण कोरोनामुक्त : देशातील 73% रुग्णांची कोरोनावर मात, फक्त 25% अॅक्टिव्ह रुग्ण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोठ्या राज्यांत रिकव्हरी वाढली, मात्र ईशान्येसह अनेक छोट्या राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांत वाढ

भारतात २०३ दिवसांच्या कोरोना काळात मंगळवारी प्रथमच अॅक्टिव्ह रुग्ण वाढीचा दर घसरून ०.५% झाला. म्हणजे, अॅक्टिव्ह रुग्ण दुपटीचा अवधी १४० दिवस झाला. कारण, नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा वाढल्याची आकडेवारी सोमवारी समोर आली. ६ महिन्यांत फक्त ३ वेळा असे घडले आहे. देशात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २० लाखांवर गेली आहे. देशात आता फक्त ६.७५ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १.९% रुग्णांचा मृत्यू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, महिनाभरात रिकव्हरी रेट १०% पर्यंत वाढला आहे. १७ जुलैला तो ६२.२% होता, १७ ऑगस्टला तो ७३% झाला. दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, तेलंगण, प. बंगाल व बिहारमध्ये रिकव्हरी रेट वेगाने वाढलाय. मात्र चंदीगड, पंजाब, केरळ, छत्तीसगडमध्ये घटला आहे. नव्या रुग्णांचा दर वाढल्याने असे घडले आहे. आधी या राज्यांचा रिकव्हरी रेट देशात सर्वाेत्तम होता.

७५% रुग्णांच्या ११ राज्यांत सरासरी ७८% रिकव्हरी, मोठ्या राज्यांत राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त

शहरांत रिकव्हरी वाढल्याने राज्यांच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, भोपाळ, इंदूर, पाटणा, जोधपूर, अहमदाबाद, सूरत, औरंगाबादसारख्या शहरांत वेगाने रिकव्हरी वाढली आहे. अशा २० शहरांतच देशातील ८०% रुग्ण होते. त्यापैकीही ८०% हून जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील २०% रुग्णच रुग्णालयांत आहेत. देशभरातील १८ लाख खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे तात्पुरती रुग्णालये उभारण्याची तयारी थंडावली आहे.