आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 19 October 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:टॉप 5 संक्रमित देशांच्या तुलनेत भारतात वेगाने रिकव्हरी; देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 75 लाख पार; 1.14 लाख रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 66.68 लाख लोक कोरोनामुक्त, 7.73 रुग्णांवर उपचार सुरू

आपल्या सर्वांसाठी एक चांगली बातमी आहे. देशात एकीकडे कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची संख्येत सतत घट होत आहे तर दुसरीकडे रिकव्हरी रेटमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. जगातील सर्वात जास्त 5 संक्रमित देशांमध्ये रिकव्हरी रेटच्या बाबतीत भारत आता अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारतातील रिकव्हरी रेट 88.82% झाला आहे. म्हणजेच देशात आता प्रत्येक 100 रुग्णांमध्ये 88 लोक बरे होत आहेत.

याबाबत ब्राझील दुसऱ्या आणि रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलचा रिकव्हरी रेट 88.72% आहे तर रशियात 76.50% लोक बरे झाले आहेत. संक्रमणाच्या बाबतीत अव्वल स्थानी असलेल्या अमेरिकेचा रिकव्हरी रेट 65.11% आहे. जगात सर्वात कमी रिकव्हरी रेट स्पेनचा (15.30%) आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 75 लाखांच्या पुढे

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 75 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 75 लाख 47 हजार 598 लोक संक्रमित झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातील 66 लाख 58 हजार 446 लोक बरे होऊन घरी गेले. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 14 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 7 लाख 73 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 54 हजार 871 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 64 हजार 47 लोक रिकव्हर झाले आणि 564 रुग्णांचा मृत्यू झाला.

देशातील काही भागात सामुदायिक संसर्ग - डॉ. हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रविवारी सोशल मीडियावरील “संडे संवाद” कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना कबूल केले की देशातील काही भागात कोरोनाव्हायरस सामुदायिक संक्रमणाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सामुहिक संसर्ग काही राज्यांतील निवडक जिल्ह्यांपुरते मर्यादित आहे. त्यात पश्चिम बंगालचा देखील समावेश आहे.

तत्पूर्वी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, "मी प्रत्येकाला सणासुदीच्या काळात संक्रमण रोखण्यासाठी देण्यात आलेल्या प्रोटोकॉलचे पालक करण्याचे आव्हान करते. राज्यात विषाणूचा सामुदायिक प्रसार झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत प्रत्येकाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे." यासंदर्भात युजरने आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना समुदायिक संसर्गाबाबत प्रश्न विचारला होता.

बातम्या आणखी आहेत...