आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 2 August News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:रुग्णांचा एकूण आकडा 17.98 लाखांवर; भारतात दर 200 रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक, गंभीर प्रकरणांची टक्केवारी अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
  • अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 17 लाख 98 हजार 147 झाला आहे. तर, देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 78 हजार 171 झाली आहे. यातील अंदाजे 9 हजार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. या बाबतीत भारत जगातील दुसऱ्या नंबरचा देश बनला आहे. 18,720 क्रिटिकल रुग्णांसोबत अमेरिका पहिल्या नंबरवर आणि 8,318 रुग्णांसोबत ब्राझील तिसऱ्या नंबरवर आहे.

परंतू, याच आकड्यांना टक्केवारीत पाहिल्यास भारतात सर्वाधिक 1.57% रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, भारतात दर 200 संक्रमितांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, देशात रविवारी 45,980 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 34,456 पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबतच देशातील अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 5 लाख 78 हजार 171 झाला आहे. रविवारी झालेल्या 666 मृत्यूसोबत देशातील एकूण मृतांचा आकडा 38,071 झाला आहे. यापूर्वी शनिवार 54 हजार 865 रुग्णांची नोंद झाली होती. ही आकडेवारी https://www.covid19india.org/ नुसार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वतः ट्विट करत याविषयी माहिती दिली.

अमित शाह यांनी ट्विटरवर लिहिले की, 'कोरोनाचे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी टेस्ट केली आहे. यात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी रुग्णालयात दाखल होत आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, जे लोक गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वतःला आयसोलेट करुन तपासणी करुन घ्यावी.'

यूपी भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि जल मंत्री महेंद्र सिंह कोरोना पॉझिटिव्ह

उत्तर प्रदेशचे भाजपाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि राज्याचे जल शक्ती मंत्री डॉ. महेंद्र सिंह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महेंद्र सिंह यांना पीजीआय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमल राणी यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. 18 जुलै रोजी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून लखनऊच्या पीजीआयमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कमल राणी घाटमपूर, कानपूर नगर येथील आमदार होत्या. याआधी त्या 2 वेळेस खासदार राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला आहे.

अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मी आता घरी आलो आहे. देवाच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने, मित्रांच्या आणि चाहत्यांच्या प्रार्थनांनी आणि मी प्रेमाने मी बरा झालो आहे. तसेच नानावटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी आज हा दिवस पाहू शकलो आहे.

बातम्या आणखी आहेत...