आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 2 September 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:24 तासांत 78 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ, 1027 मृत्यू, 62 हजार लोक बरे झाले; अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 8 लाख पार, आतापर्यंत 37.66 प्रकरणे

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो तेलंगानाची राजधानी हैदराबादचा आहे. येथे भाविकांनी गणपती विसर्जनाच्या वेळी पीपीई किट घातली होती
  • पुणे हे देशातील सर्वात संक्रमित शहर बनले, येथे 1.75 लाखाहून अधिक रुग्ण आहेत

देशात मंगळवारी कोरोना संक्रमितांची संख्या 37 लाख पार झाली. आतापर्यंत 37 लाख 66 हजार 108 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 24 तासांत 78 हजार 168 नवीन रुग्णांची वाढ झाली. तर 1,027 रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी 62 हजार 146 रुग्णांना घरी सोडण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे यापैकी 28 लाख 99 हजार 521 लोक बरे देखील झाले आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 8 लाखांहून अधिक झाली आहे. देशात सध्या 8 लाख 972 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 66 हजार 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे हे देशातील सर्वात संक्रमित शहर बनले

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत पुणे हे देशातील सर्वाधिक बाधित शहर बनले आहे. 1.75 लाखापेक्षा जास्त संक्रमितांसोबत पुण्याने दिल्लीला मागे टाकले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या काळात 91,903 रुग्णांसह पुणे संक्रमित रुग्णांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होते. मात्र एका महिन्यात येथे सर्वाधिक 83 हजार रुग्ण वाढले.

काही आठवड्यांपासून दररोज दोन-तीन हजार रुग्ण आढळत आहेत. पुण्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या देखील जास्त आहे. येथे सध्या 52 हजारांपेक्षा जास्त अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. कधी सर्वाधिक संक्रमित राहिलेल्या मुंबईत फक्त 20 हजार आणि दिल्लीत 15 हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही आठवड्यांत पुण्यातील सक्रिय रुग्ण वेगाने वाढले आहेत. म्हणजेच बहुतेक संक्रमण हे अलिकडच्या दिवसांतले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून चाचण्यांची वाढलेली संख्या यामागचे कारण सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात संक्रमणाचा आकडा 8 लाखांच्या पुढे

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख पार झाली आहे. मंगळवारी 15 हजार 675 नवीन रुग्ण सापडले. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 8 लाख 8 हजार 306 झाली आहे. तर आतापर्यंत 24 हजार 903 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेटमध्ये सतत वाढ होत आहे. राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट 72.32% आहे.

0