आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 20 July News And Updates; Maharashtra Mumbai Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Telangana Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:रुग्णांचा आकडा 11.45 लाखांवर; उत्तर प्रदेश आणि आंध्रातील संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या पुढे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो नवी दिल्लीचा आहे. लोक साथरोगाच्या काळात अन्न वाटपाची वाट पाहत आहेत

देशातील रुग्णसंख्या 11 लाख 45 हजार 743 झाली आहे. रविवारी विक्रमी 40 हजार 253 लोक पॉझिटिव्ह आढळले. एका दिवसातील हा आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश आरोग्य विभागानुसार, राज्यात आता दररोज 50 हजार पेक्षा जास्त लोकांची चाचणी घेतली जात आहे. राज्यात आतापर्यंत 14 लाख 70 हजार पेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत. दुसरीकडे, आयआयटी भुवनेश्वर आणि एम्सच्या संशोधकांच्या अभ्यासानुसार, मान्सून आणि हिवाळ्याच्या काळात भारतात कोरोनाचा संसर्ग आणखी जास्त वेगाने वाढेल.

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात सोमवारी रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. यूपीमध्ये 1,913 नवीन रुग्णांसोबत 51,160 एकूण संक्रमित जाले आहेत. तर, आंध्र प्रदेशात सोमवारी 4,074 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 53,724 रुग्ण झाले आहेत.

देशात आतापर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त 

या दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे, देशात बरे झालेल्या रुग्णांचा संख्या 7 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 7 लाख 23 हजार 799 लोकांनी कोरोनावर मात केली. सोमवारी 22 हजार 992 लोकांना रुग्णलयातून घरी सोडण्यात आले. सध्या देशातील विविध रुग्णालयांत 4 लाख 482 लोकांवर उपचार सुरू आहे. देशात कोरनामुळे आतापर्यंत 28,078 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. 

अपडेट्स

> श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी आज देवघरचे बाब वैद्यनाथ मंदिरात पुजाऱ्यांनी पूजा केली. कोरोनामुळे भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. 

> भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) नुसार, 19 जुलैपर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 40 लाख 47 हजार 908 नमुन्यांची चाचणी केली. यापैकी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या मते, 2 लाख 56 हजार 039 नमुन्यांची चाचणी झाली. 

> मान्सून आणि हिवाळ्यात देशात संसर्ग आणखी वेगाने वाढले. आयआयटी भूवनेश्वर आणि एम्सच्या अभ्यासात ही माहिती समोर आली. यात म्हटले की, पावसामुळे तापमानातील घट आणि हिवाळ्यात वाढती थंडी यामुळे संसर्ग सहजतेने पसरेल.