आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 20 October News And LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:24 तासांत आढळले 44,747 नवीन रुग्ण, तर 586 जणांचा मृत्यू; 69,237 रुग्ण बरे झाले, एकूण रुग्णसंख्या 75.52 लाख

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोना साथीच्या दरम्यान सणासुदीच्या हंगामात बाजारात लोकांची गर्दी वाढली आहे.
  • देशात सध्या एकूण 7 लाख 47 हजार 478 अॅक्टीव्ह रुग्ण
  • देशात आतापर्यंत 66.60 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 7.72 लाखांवर उपचारसुरू, 1.15 लाख मृत्यू

देशात सोमवारी 44 हजार 747 रुग्णांची नोंद झाली, 69 हजार 237 रुग्ण बरे झाले आणि 586 जणांचा मृत्यू झाला. मागील दोन महिन्यांतील नवीन रुग्णांची ही तिसरी सर्वात कमी संख्या आहे. याआधी 24 ऑगस्ट रोजी 59 हजार 696 रुग्ण आढळले होते. 12 ऑक्टोबर रोजी 54 हजार 262 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या तीन महिन्यांत सहाव्या वेळी 60 हजारांपेक्षा कमी प्रकरणे नोंदली गेली आहेत. आतापर्यंत देशात 75.93 लाख प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 1.15 लाख मृत्यू झाले आहेत.

देशात सध्या एकूण 7 लाख 47 हजार 478 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील शास्त्रज्ञांकडून कोविडच्या प्रकरणांचे पूर्वानुमान मॉडेल तयार केले आहे. कोविडची प्रकरणे पुढील 3-4-. महिन्यांपर्यंत कमी होत जातील असे त्यांच्या संशोधनात समोर आले आहे. फेब्रुवारी पर्यंत अॅक्टीव्ह रुग्ण 40 हजारपर्यंत राहतील.

यापूर्वी रविवारी सरकारने तयार केलेल्या वैज्ञानिकांच्या राष्ट्रीय सुपरमॉडेल कमिटीने असा दावा केला होता की सप्टेंबरमध्येच देशातील कोरोनाचा पीक येऊ गेला आणि फेब्रुवारी 2021 मध्ये कोरोना संपेल. या समितीत आयआयटी हैदराबाद आणि आयआयटी कानपूरसह अनेक नामांकित संस्थांच्या तज्ञांचा समावेश आहे.