आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 21 October 2020 News And LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट, पण भारतात रुग्ण वाढण्याची गती कमी; रिकव्हरी रेट 88.63 टक्क्यांवर, आतापर्यंत 76.48 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.15 लाख पेक्षा जास्त मृत्यू, 7.39 रुग्णांवर उपचार सुरू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) एक अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार युके, यूएस, स्पेन, फ्रान्स यांसह जगातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. येथे संक्रमित लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याउलट भारतात रुग्ण वाढीची गती वेगाने कमी होत आहे.

अहवालानुसार, मागील आठवड्यात भारतात 10 लाख लोकसंख्येमागे 310 लोक संक्रमित आढळले. याच लोकसंख्येत ब्राझीलमध्ये 665, रशियात 706, स्पेनमध्ये 936, अमेरिकेत 1153, यूकेत 1746 आणि फ्रान्समध्ये 2457 लोक पॉझिटिव्ह मिळत आहेत. जगातील प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमध्ये सरासरी 315 रुग्ण आढळले आहेत. म्हणजे जगाच्या सरासरी वेगापेक्षा भारत कमी रुग्ण आहे. 10 लाख लोकसंख्येमध्ये 83 लोकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

रिकव्हरीच्या बाबतीत भारत जगात आघाडीवर

रिकव्हरीच्या बाबती भारत संपूर्ण जगात आघाडीवर आहे. भारतात सर्वाधिक 67 लाख 91 हजार 113 लोक कोरोनामुक्त झाले. चाचण्यांच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात आतापर्यंत 9.60 कोटींपेक्षा जास्त लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे देशात अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्याही वेगाने कमी होत आहे. दीड महिन्यांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत 2 लाखाहून अधिक घट दिसून आली आहे.

रुग्णांचा आकडा 76 लाख पार

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 76 लाख पार झाला आहे. आतापर्यंत 76 लाख 48 हजार 373 लोक संक्रमित आढळले आहेत. मागील 24 तासांत 53 हजार 635 नवीन रुग्णांची नोंद झाली. 703 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार 496 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशातील एकूण मृत्युसंख्या 1 लाख 15 हजार 939 झाली आहे. देशभरात सध्या 7 लाख 39 हजार 895 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.