आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवारी(दि.22) देशातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 30 लाखांच्या पुढे गेला आहे. शनिवारी 65,215 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली तर 881 रुग्णांची नोंद झाली. सध्या देशात 7,06,857 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत, तर 22,74,345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासात सर्वाधिक 10 लाख 23 हजार 836 चाचण्या झाल्या. केंद्र सरकार आता चाचण्याची संख्या वाढवून 15 लाख करण्याच्या तयारीत आहे.
राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासाला परवानगी- केंद्र सरकार
केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासाला परवानगी दिली आहे. केंद्राने म्हटले की, आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवास करण्यास परवानगी आहे. यासाठी ई पासची गरज नसेल.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 6.71 लाखांवर राज्यात शनिवारी 14,492 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोहबतच राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 6,71,942 झाला आहे. तसेच, शनिवार झालेल्या 297 मृत्यूसोबत एकूण मृतांचा आकडा 21,995 झाला आहे. सध्या राज्यात 1,69,516 रुग्णांवर उपचार सुरू असून, 4,80,114 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
काेराेना संसर्गाविरुद्ध भारताचा लढा यशाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. शुक्रवारी बरे होण्याचा दर 75% पर्यंत पोहोचला. आता सुमारे 23.8% रुग्ण संक्रमित आहेत.
> 71.4% रिकव्हरी महाराष्ट्रात. हे सर्वाधिक संक्रमित राज्य. संक्रमणाची सर्वाधिक गती असलेल्या आंध्रात 72.3% रिकव्हरी.
> 50% पेक्षा कमी रिकव्हरी फक्त मेघालयातच. तेथे 43.4% रिकव्हरी आहे.
3 वर्षांत संसर्गजन्य राेगांमुळे जेवढे मृत्यू झाले, त्यापेक्षा जास्त बळी काेराेना विषाणूने घेतले
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आतापर्यंत 54,849 लोकांचा बळी घेतला आहे. हा आकडा गेल्या 3 वर्षांमध्ये देशात संसर्गजन्य रोगांमुळे झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षा जास्त झालेला आहे.
> दिलासादायक बाब ही की, कोरोनाचा मृत्युदर 1.8% आहे, तर 2018 मध्ये जपानी तापाने 11% व एच 1 एन 1 मुळे 7% रुग्णांचा मृत्यू झाला होता.
> गेल्या 6 महिन्यांत काेराेना संसर्गाने झालेले मृत्यू 54,849
> 2016 ते 2018 पर्यंत संसर्गजन्य रोगांचे बळी 41,890
> 28.1% मृत्यू गेल्या तीन वर्षांत न्यूमोनियामुळे झाले. हे संसर्गजन्य रोगांमुळे झालेल्या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण आहे.
> 24.2% लोकांचा मृत्यू अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे झाला होता.
काेराेनाबाधित रुग्णांच्या पोस्टमाॅर्टेम रिपोर्टमध्ये आढळल्या फुप्फुस, यकृतात जखमांच्या खुणा
काेराेना संसर्गामुळे प्राण गमावलेल्या ब्रिटनच्या 10 रुग्णांच्या शवविच्छेदन अहवालात आश्चर्यकारक तथ्य समोर आले. या सर्वांच्या फुप्फुसांत जखमा आढळल्या. अनेकांच्या यकृतातही जखमा आढळल्या. 10 पैकी 9 रुग्णांच्या हृदयात, फुप्फुसात आणि यकृतात रक्ताच्या गुठळ्या आढळल्या. ‘लॅन्सेट मायक्रोब’मध्ये प्रकाशित हे संशोधन लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संशोधकांनी केले. या चमूच्या मते, या तथ्यांमुळे डॉक्टरांना संक्रमितांच्या उपचारादरम्यान निर्माण होणाऱ्या जटिलतांच्या उपचारात मदत मिळू शकते.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये लोकांना मास्कविना फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. तेथे 13 दिवसांपासून संसर्गाचे एकही प्रकरण आढळले नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.