आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 22 October LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:डेटा चोरीनंतर डॉ.रेड्डीज कंपनीने जगभरातील प्लांट केले बंद, काही दिवसांपूर्वीच मिळाली होती रशियन व्हॅक्सीनच्या चाचणीची परवानगी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण रुग्णसंख्या 77 लाख पार, 68.71 लाख रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत 1.16 लाख मृत्यू

सर्व्हरमधून डेटा चोरी झाल्यानंतर औषध निर्माता कंपनी डॉ. रेड्डीज लेबोरेट्रीजने त्यांचे जगभरातील प्लांट बंद केले आहेत. डॉ. रेड्डीजचे अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, रशिया आणि भारतात औषध प्लांट आहेत. या कंपनीला काही दिवसांपूर्वी रशियन कोरोना व्हॅक्सीनच्या चाचणीला मंजुरी मिळाली होती. DGCIने डॉ. रेड्डीजला देशात रशियाची व्हॅक्सीनच स्पूतनिक-वीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली होती.

दुसरीकडे जगातील अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली आहे. यासोबतच या देशांमध्ये मृत्यू वेगाने वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे भारतात याच्या उलट मृत्यूंची संख्याचा वेग मंदावत आहे. देशात दररोज सरासरी 700-800 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हाच आकडा 1 हजार ते 1100 पर्यंत पोहोचला होता.

आकडेवारी पाहिल्यास अमेरिकेत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या घटून 400-600 पर्यंत झाली होती. ती आता पुन्हा वाढून 700-800 झाली आहे. अशाप्रकारे स्पेनमध्ये 50-100 रुग्णांचा मृत्यू होत होता. हा आकडा आता 150 ते 290 झाला आहे. भारतात आतापर्यंत 1.16 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 703 लोकांनी प्राण गमावले.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 5 हजार 158 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 68 लाख पार झाली आहे. देशात आतापर्यंत 68 लाख 71 हजार 895 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या 7 लाख 15 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 56 हजार नवीन प्रकरणे आढळली आणि 79 हजार 342 लोक बरे झाले. देशात कोरोनामुळे 1 लाख 16 हजार 653 लोकांचा मृत्यू झाला आहे.

5000 रुपयांत होणार कोरोनाची तपासणी

आयआयटी खरगपूरने विकसित केलेल्या कोरोना तपासणी उपकरणाला आयसीएमआरने हिरवी झेंडी दाखवली. या यंत्रामुळे अवघ्या 500 रुपयांत कोरोनाची तपासणी करून तासाभरात अहवालही हाती येईल. या यंत्राची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.