आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 22 September 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:भारतात कोरोना रुग्णांचा आकडा 55 लाखांजवळ, अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घटही; अॅक्टिव्ह रुग्णवाढ 0.64%, दुप्पट रुग्ण 474 दिवसांत शक्य

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलमध्ये अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा सर्वोच्च दर 22% पर्यंत गेला होता
  • संपूर्ण भारतात एकाच वेळी ‘पीक’ येणार नाही, मुंबई-दिल्लीच्या मोठ्या भागांत तो येऊन गेला

भारतात प्रथमच काेराेना अॅक्टिव्ह रुग्ण वाढीचा दर घसरून ०.६४% झाला आहे. १९ सप्टेंबरला तो १.०% होता. एका दिवसात त्यात ०.३६% घट झाली. आता दर वाढला नाही किंवा स्थिर राहिला तर अॅक्टिव्ह रुग्ण ४७४ दिवसांत दुप्पट होतील. म्हणजे त्याला वर्षभरापेक्षा जास्त दिवस लागतील. एप्रिलमध्ये दर २२% होता. लाॅकडाऊन- २ मध्ये घटून ताेे ५ टक्क्यांवर आला. अनलॉक-१ (जूनमध्ये) ताे २.५% झाला. रिकव्हरी रेट सुधारल्याने असे घडले.

> अॅक्टिव्ह रुग्णवाढीचा दर ०% झाला तर त्याला संसर्गाचा सर्वाेच्च स्तर म्हटले जाऊ शकते. यानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अतिशय वेगाने वाढते.

काेराेनाच्या ‘पीक’वर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

> पूर्ण भारतात एकाच वेळी पीक (सर्वोच्च पातळी) येणार नाही. विविध राज्यांसह अनेक शहरांचाही पीक वेगळा असू शकतो.

> मुंबई आणि दिल्लीच्या एका मोठ्या भागात पीक येऊन गेल्याचे मानता येईल. इतर शहरांत अद्याप अशी स्थिती नाही.

> रुग्णसंख्येच्या आधारे पीक ठरवला जाऊ शकत नाही. कारण, सध्या देशात फक्त ५५ लाखच काेरोना रुग्ण समोर आले आहेत.

> रिकव्हरी रेट वाढीचा पीकशी काही संबंध नाही. कारण, लॉकडाऊन व इतर बंदीमुळे संसर्ग रोखला जाऊ शकताे. यामुळे रिकव्हरी रेट वाढेल, मात्र पीकचा अंदाज येईल, असा त्याचा अर्थ नसतो.

> पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत देशात हर्ड इम्युनिटीसारखी स्थिती शक्य. कारण मोठ्या पातळीवर सामूहिक संसर्ग झाला आहे.

> ५० ते ६०% लोकांना संसर्गानंतर आता जास्त रुग्ण आढळणार नाही. कारण आता हर्ड इम्युनिटी आली आहे, असे म्हणता येईल.

- डॉ. प्रो. के. श्रीनाथ रेड्डी, पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे प्रमुख आणि डॉ. प्रो. संजय राय, कम्युनिटी मेडिसिन, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, एम्स, दिल्ली.