आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 23 July News And Updates; Maharashtra Mumbai Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Telangana Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:एकूण रुग्णसंख्या 12.69 लाखांवर; यातील 8 लाखांपेक्षा जास्त कोरोनामुक्त, फेस मास्क-पीपीई किट नष्ट करण्याची नवीन गाइडलाइन जारी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12 लाख 69 हजार 532 झाली आहे. चांगली बाब म्हणजे, यातील 8 8 लाख 3 हजार 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता फक्त 4 लाख 35 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, देशातील मृतांचा आकडा 30 हजारांच्या पुढे गेला आहे. 11 मार्चला देशात पहिला कोरोना मृत्यू झाला होता. त्यानंतर फक्त 135 दिवसात 30 30 हजार 231 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोव्हिड वेस्ट मटेरियल नष्ट करण्याची नवीन गाइडलाइन

सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डाने कोव्हिड-19 च्या उपचारात वापर होणाऱ्या फेस मास्क, ग्लव्स, पीपीई किट आणि इतर वेस्ट मटेरियलला नष्ट करण्यासाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहे. जानकारांनुसार, दररोज प्रत्येक राज्यातून सरासरी 2 ते 3 टन कोव्हिड वेस्ट निघत आहे. याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याची गरज आहे. गाइडलाइननुसार, मास्क, ग्लव्स, पीपीई किट आणि इतर वेस्ट मटेरियलला कापून 72 तास एखाद्या पेपरमध्ये गुंडाळावे लागेल. यानंतर डिस्पोज करता येईल. दरम्यान, झारखंड सरकारने लॉकडाउनच्या नियमांना अजून कठोर केले आहे. नवीन नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास आणि थुंकल्यास एक लाख रुपयांचा दंड लावला जाईल. झारखंड कॅबिनेटने बुधवारी रात्री हा निर्णय जाहीर केला. 

सीरो सर्व्हेत खुलासा : अहमदाबादमध्ये दर दुसरी व्यक्ती बाधित

अहमदाबादमध्ये ४९% लोक कोरोनाबाधित आहेत. हा खुलासा ११ कोरोना संसर्गित शहरांमधील कन्टेनमेंट झोनमध्ये केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला. मुंबई व आग्र्यातील कंटेंनमेंट झोनमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. दिल्लीत २३.४८% लोक बाधित आहेत. सुरत, जयपूर, इंदूर, चेन्नई, हैदराबाद व जोधपूरमध्ये ८% कमी लोक बाधित आहेत. दिल्लीत कोविड मॉनिटरिंग कमिटीचे सदस्य डॉ. डी. के. सरीन म्हणाले, लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाली आहे. यामुळे आगामी काळात रुग्ण कमी होतील.

बंगळुरू झाले अनलॉक, तर महाराष्ट्रात मॉलबाबत विचार

बंगळुरूमध्ये बुधवारी लॉकडाऊन उघडला. शहरात १४ जुलैला ९ दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. बुधवारी येथे जनजीवन पुन्हा सुरळीत झाले. दरम्यान, महाराष्ट्रातही शॉपिंग मॉल आणि जिम सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

भाेपाळमध्ये १० दिवस लॉकडाऊन, मणिपूरही बंद:

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी विक्रमी २१५ रुग्ण आढळले. शहरातील बाधितांची संख्या पाच हजार झाली. यामुळे भोपाळमध्ये २५ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दुसरीकडे, मणिपूरमध्येही गुरुवारी पूर्णपणे लॉकडाऊन असेल.