आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 24 August 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशात संसर्गाचा फैलाव नियंत्रणात येतोय..; अडीच महिन्यांत प्रथमच कोरोना संसर्गाचा दर घटून झाला 6.7%, टेस्टमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण ऑगस्टमध्ये 12.7% वर गेले होते

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओनुसार, दर 5% पेक्षा कमी असेल तर संसर्ग नियंत्रण आल्याचे मानले जाते
  • तज्ञांचे मत... चाचण्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी म्हणजे ‘पीक’ची चाहूल

कोरोना संकटात दिलासादायक बातमी. जुलैअखेरपर्यंत १०० चाचण्यांमध्ये १२ पेक्षा अधिक रुग्ण आढळत होते, आता ७ रुग्ण आढळत आहेत. म्हणजे संसर्गाचे प्रमाण ७% पेक्षा खाली आले. याचे कारण वाढलेल्या चाचण्या होय. उप्र.-बिहारमध्ये ५% पेक्षा कमी चाचण्या, महाराष्ट्रात १६ %पेक्षा अधिक.

पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले की, संसर्गाचे प्रमाण जेव्हा घटते म्हणजे १०० चाचण्यांमागे ५ किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळले तर महामारी नियंत्रणात आहे असे मानले जाते. संसर्गाचे घटते प्रमाण हे चांगले संकेत आहेत. कोरोनाची सर्वोच्च पातळीसाठी हे महत्त्वाचे आहे. मोठ्या राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटते आहे, परंतु छोट्या राज्यांमध्ये प्रमाण वाढते आहे. हे महामारीचा प्रादुर्भाव होण्याचे संकेत आहेत.

कोरोनाची सर्वोच्च पातळी येणार असल्याची चर्चा देशभरात सुरू आहे. महामारी सर्वोच्च पातळी गाठते म्हणजे काय व कशी याविषयी सांगताहेत देशातील दोन तज्ञ.

सर्वोच्च पातळी म्हणजे यश नव्हे, केवळ साथीची व्याप्ती किती झाली हे समजेल

> ज्या देशांमध्ये ‘पीक’ गाठले त्यापासून आपण काय धडा घ्यावा ?

धडा हाच की, पीक आल्यानंतर खबरदारी घेतली नाही तर महामारीचा पुन्हा फैलाव होऊ शकतो. उदा. न्यूझीलंडमध्ये १०० दिवस एकही रुग्ण नव्हता.आता नवे रुग्ण आढळत आहेत. अमेरिकेत २४ जुलै रोजी आणि ब्राझीलमध्ये २९ जुलै रोजी सर्वाधिक रुग्ण सापडले. म्हणजे तिथे एक महिन्यापूर्वी नव्या रुग्णांचे प्रमाण सर्वोच्च पातळीवर होते. आता तिथे ४० हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. जसे स्पेनमध्ये २० मार्च रोजी १०,८५५ रुग्ण,१ मे रोजी १२८८, ५ जुलै ४०६ आणि २१ ऑगस्ट रोजी पुन्हा ३६०५ रुग्ण आढळले. तात्पर्य एवढेच की, पीक आले तरीही कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. आपण ढिलाई दाखवली की नवे रुग्ण ‌वाढतील.

> आपले शहर किंवा देशात कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठली हे कसे कळेल ?

सलग दोन आठवडे नव्या रुग्णांची संख्या वाढली नाही, उलट प्रमाण घटते आहे असे दिसले तर? उदा. १ ते १४ तारखेपर्यंत नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्यास समाजावे की सर्वोच्च पातळी गाठली आहे. काही तज्ञ अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येवरूनही गणना करतात. म्हणजे १५ दिवस अॅक्टिव्ह रुग्णांची वाढ ० टक्के अथवा त्यापेक्षा कमी असल्यास त्याला सर्वोच्च पातळी (पीक)मानले जाते. देशात अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ०.२ % पर्यंत घसरले आहे.

> भारतात सर्वोच्च पातळी कधी येईल ?

हे सांगणे कठीण आहे. कारण, इराण-द. कोरिया-जपानसारख्या काही देशांत नवे रुग्ण महिना-महिना वाढले नाहीत. नंतर अचानक वाढले. काही तज्ञांनी त्याला कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले. तथापि, भारताची परिस्थिती वेगळी आहे. इथे लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे इथे टप्प्याटप्यात कोरोनाची सर्वोच्च पातळी येईल.

> ज्या राज्यांमध्ये १४ दिवसांत नवे रुग्ण वाढले नाहीत तिथे ‘पीक’ गाठले का ?

दिल्ली आणि मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाने पीक गाठले आहे. अशा ज्या शहरांमध्ये १५ दिवसांत नवे रुग्ण आढळले नाहीत आणि संसर्गाचे प्रमाण घटते आहे तिथे सर्वोच्च पातळी गाठली आहे.

> लाॅकडाऊन अथवा इतर निर्बंधामुळे पीक लवकर येऊ शकते का ?

नाही. जगभरातील आतापर्यंतच्या संशोधननानुसार लाॅकडाऊनसारखे बाह्य उपाय कोरोनाला केवळ काही दिवस रोखू शकतात.

> सर्वोच्च पातळीनंतर कितपत घटेल ?

यामुळे संसर्गाचा फैलाव काही प्रमाणात घटेल. पण संपणार नाही. पीक आल्यास साथरोगाची व्याप्ती कितपत आहे हे समजेल. म्हणजे दररोज रुग्ण ७५ हजारपेक्षा कमी वाढले तर या रुग्णांना सांभाळण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल हे कळेल.