आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 24 July News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 13.33 लाखांवर; बंगळुरू पोलिस ट्रेनिंग स्कूलमधले 90 पेक्षा जास्त ट्रेनी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील संक्रमितांचा आकडा 13 लाख 33 हजार 553 झाला आहे. चांगली बाब म्हणजे, यातील 8 लाख 47 हजार 803 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, आतापर्यंत देशभरातील 31 हजार 390 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या 4 लाख 53 हजार 940 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवरी covid19india.org वरील माहितीच्या आधारावर आहे.

दरम्यान, बंगळुरूमधील पोलिस ट्रेनिंग स्कूलमधील 90 पेक्षा जास्त ट्रेनी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एक कॉन्स्टेबल कोरोना संक्रमित झाला होता, यानंतर ट्रेनिंग स्कुलमधल्या 90 जणांना कोरोनाची लागण झाली. तिकडे, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. ते सध्या लखनऊमधील आपल्या घरात आयसोलेट आहेत.

रेल्वे विभागाने सांगितले की, देशात 9 जुलैपर्यंत 4165 श्रमिक विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. आता याची मागणी नाही. याद्वारे 63 लाख लोकांना त्यांच्या घरी पोहचवण्यात आले. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के यादव यांनी सांगितले की, एखाद्या राज्याने श्रमिक रेल्वेची मागणी केल्यास त्यावर विचार केला जाईल.

सामूहिक आयोजन करु नका, तंत्रज्ञानाचा वापर करुन साजरा करा उत्सव

केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाशी संबंधित मार्गदर्शक सूचना जारी केली. ही सूचना सर्व सरकारी कार्यालये, राज्य सरकार आणि राज्यपाल यांना पाठविण्यात आले आहे. सूचनांमध्ये स्वातंत्र्यदिनी सामूहिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

संक्रमणाचा धोका

सूचनांमध्ये म्हटले आहे की, संक्रमणाचा धोका पाहता काही नवीन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग, मास्क, सॅनिटायजेशनसारखे उपाय योजावे लागतील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. होम आणि हेल्थ मिनिस्ट्रीच्या पहिले जारी केलेल्या गाइडलाइंन्सचे पालन करावे लागेल. वेब कास्टच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे.