आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:अ‍ॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत 7 व्या क्रमांकावर, देशात सध्या 4.78% रुग्ण; 93.74% लोक कोरोनामुक्त झाले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 86.03 लाख रुग्ण कोरोनामुक्त, 1.34 लाख जणांचा मृत्यू

देशातील अनेक राज्यांत कोरोना वाढत आहे. परंतु या दरम्यान एक दिलासादायक बातमी आहे. अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत भारत 6 व्या क्रमांकावरून आता 7 व्या क्रमांकावर आला आहे. मागील 53 दिवसांत तीन वेळा अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढली असून इतर दिवसांत यामध्ये घट झाली आहे.

सध्या देशात 4.78% रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित 93.74% लोक बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण संक्रमितांपैकी 1.46% रुग्णांचा मृत्यू झाला. जगतील 10 सर्वाधिक संक्रमित देशांमध्ये भारताचा कोरोनामुक्तीचा दर सर्वाधिक चांगला आहे.

अमेरिकेत सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्ण, रिकव्हरी बाबतीत बेल्जियम-फ्रान्स अपयशी

अमेरिकेत आता सर्वाधिक 48.73 लाख अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्स (19.41 लाख)आहे. रिकव्हरीच्या बाबतीत बेल्जियम आणि फ्रान्सची अवस्था वाईट आहे. बेल्जियममध्ये 6.48% लोक, तर फ्रान्समध्ये आतापर्यंत 6.98% रुग्ण बरे झाले आहेत.

देशात अॅक्टीव्ह रुग्ण 4.37 लाख, जुलैपासून सर्वाधिक कमी

देशात सोमवारी कोरोनाचे 37 हजार 441 नवीन रुग्ण आढळले, 42 हजार 195 बरे झाले आणि 481 रुग्णांचा मृत्यू झाला. अशाच अॅक्टीव्ह रुग्णांत 5 हजार 251 ची घट झाली. मागील सहा दिवसातील ही सर्वाधिक मोठी घट आहे. याआधी 17 नोव्हेंबर रोजी 6 हजार 6854 अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले होते.

देशातील एकूम रुग्णसंख्या 91.77 लाख झाली आहे. यातील 86.03 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1.34 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 4.37 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अॅक्टीव्ह रुग्णांचा हा आकडा 22 जुलैनंतरचा सर्वात कमी आहे. ही आकडेवारी covid19india.org या वेबसाइटनुसार आहे.

कोरोना अपडेट

  • मध्यप्रदेश सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 4000 कैद्यांची पॅरोल आणखी 60 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
  • हिमाचल प्रदेशात 24 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत शिमला, मंडी, कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यात रात्री आठ ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • हिमाचल प्रदेशमध्ये 12 फेब्रुवारीपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता 1 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यानंतर 1 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या राहणार आहेत. तसेच राज्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिल्लीत मोबाइल व्हॅऩ RT-PCR लॅबची सुरुवात केली. ICMR ची ही मोबाइल व्हॅन लॅब कंटेनमेंट झोनजवळ उभी करण्यात येणार आहे. येथे कोणालाही 499 रुपयांत कोरोनाची चाचणी करता येणार आहे. तसेच कोरोनाचा रिपोर्ट केवळ 6 तासांत दिला जाणार आहे.
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser