आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 24 October LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशात 10 कोटी चाचण्या पूर्ण, चीन आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक चाचण्या करणारा भारत तिसरा देश; एकूण रुग्णसंख्या 78.13 लाख पार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील मृतांची संख्या 1.17 लाखांपेक्षा जास्त, कोरोनामुक्तांचा आकडा 70 लाख पार, सध्या 6.80 लाख रुग्णांवर उपचार सुरू

देशातील कोरोना चाचण्यांची संख्या 10 कोटी झाली आहे. चीन आणि अमेरिकेनंतर भारत तिसरा देश आहे जिथे सर्वाधिक लोकांची चाचणी झाली. चीनमध्ये आतापर्यंत 16 कोटी तर अमेरिकते 12 कोटी लोकांची चाचणी झाली आहे.

भारतात पहिल्या 5 कोटी लोकांच्या चाचणीत 42 लाख 77 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. तेव्हापर्यंत 72 हजार 815 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर 5 ते 10 कोटी लोकांच्या चाचण्यांमध्ये 34 लाख 78 हजार रुग्ण सापडले. तसेच मृतांची संख्या देखील कमी झाली. या दरम्यान 44 हजार 462 रुग्णांचा मृत्यू झाला.

दर 10 लाख लोकसंख्येमध्ये 72 हजार चाचण्या

देशात सध्या प्रत्येत 10 लाख लोकसंख्येमध्ये 72,326 लोकांची चाचणी होत आहे. यामध्ये 5,608 लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर 85 रुग्णांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेत इतक्याच लोकांमध्ये 3 लाख 91 हजार 452 आणि चीनमध्ये 1 लाख 11 हजार 163 लोकांची चाचणी होत आहे.

एकूण रुग्णसंख्या 78 लाख पार

देशातील एकूण रुग्णसंख्या 78 लाख 13 हजार 667 झाली आहे. यातील 6 लाख 80 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 70 लाख 13 हजार 539 रुग्णांनी डिस्चार्ज देण्यात आला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 17 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे.