आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 25 October LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशातील 90% रुग्ण रिकव्हर, अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 3 दिवसांत 58 हजारांनी कमी झाली; आतापर्यंत 78.63 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 6.68 लाख रुग्णांवर उपचार सुरू, 1.18 लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 78 लाख 63 हजार 139 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 70 लाख 74 हजार 807 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 6 लाख 68 हजार 470 रुग्णांवर सध्या अद्याप उपचार सुरू आहेत. ।

मागील 5 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता रिकव्हरी रेटमध्ये 2% वाढ झाल्याचे दिसते. 19 ऑक्टोबर रिकव्हरी रेट 87% होता. तो आता 89.74% झाला आहे. मागील 3 दिवसांत अॅक्टीव्ह रुग्णांमध्ये 58 हजारची घट दिसून आली.

देशात सध्या 16 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा कमी झाली आहे. दादरा आणि नगर हवेलीत सर्वात कमी 51, मिझोरममध्ये 175, अंदमान निकोबारमध्ये 204, सिक्किममध्ये 242 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. याशिवाय उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, पद्दुच्चेरी, गोवा, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, लडाख आणि चंढीगडमध्ये देखील अॅक्टीव्ह रुग्णसंख्या कमी आहे.