आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 26 August 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना अपडेट:पंजाब सरकारमधील 23 मंत्री आणि आमदार कोरोना संक्रमित ; देशातील एकूण रुग्णसंख्या 32.87 लाखांच्या पुढे तर ठीक झालेल्या रुग्णांचा आकडा 25 लाखांच्या पुढे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील कोरोना संक्रमणामुळे मरणाऱ्यांचा आकडा 60 हजारांच्या पुढे

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 32.87 लाखांच्या पुढे गेला आहे. चांगली बाब म्हणजे, बुधवारपर्यंत देशातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडाही 25 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात 7.15 लाखांच्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, आतापर्यंत 60,285 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये 69% पुरुष आणि 31% महिला आहेत. वयाच्या बाबतीत, मृत्यू झालेल्यांपैकी 36% लोक 45-60 वर्षे वयोगटातील आणि 51% लोक 60 किंवा त्याहून अधिक वयाचे होते.

यादरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, पंजाबचे विधानसभा अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वी सरकारमधील 23 मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. विधानसभा अध्यक्ष राणा केपी सिंग यांनी अधिवेशनात सामील होणाऱ्या सर्व आमदरांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते, यात हे सर्व नेते पॉझिटिव्ह आढळले.

बंगालमध्ये 7,11 आणि 12 सप्टेंबरला टोटल लॉकडाउन

पश्चिम बंगाल सरकारने राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबरला टोटल लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जींनी म्हटले की, यामुळे संक्रमणावर आळा घालता येईल. या लॉकडाउनदरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

0