आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 26 Dec 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:24 तासांत 22 हजार रुग्ण कोरोनामुक्त, 161 दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी; अरुणाचल प्रदेशात 48 तासांत एकही रुग्ण आढळला नाही

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 97.39 लाख रुग्ण कोरोनामुक्त तर 1.74 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांची सतत कमी होत आहे. मागील 24 तासांत सुमारे 22 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली. हा आकडा मागील मागील 161 दिवसांतील सर्वात कमी आहे. याआधी 17 जुलै रोजी 17 हजार 486 लोकांनी कोरोनाला हरवले होते. तर 21 सप्टेंबर रोजी सर्वाधिक 1 लाखांपेक्षा जास्त लोक बरे होऊन घरी गेले होते.

अरुणाचल प्रदेशात 48 तासांत एकही रुग्ण नाही

चांगली बातमी म्हणजे अरुणाचल प्रदेशात मागील 2 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. येथे 23 डिसेंबर रोजी कोरोनाचे 12 रुग्ण आढळले होते. 48 तासांत येथे 53 लोक कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 16 हजार 678 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापैकी 16 हजार 454 लोक बरे झाले आहेत. तर 168 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. अरुणाचल प्रदेशात कोरोनामुळे आतापर्यंत 56 लोकांचा मृत्यू झाला आहे.

24 तासांत 22 हजार रुग्णांची नोंद

देशात मागील 24 तासांत कोरोनाच्या 22 हजार 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. 22 हजार 184 रुग्ण बरे झाले आणि 251 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत 99 ची घसरण झाली. सक्रीय प्रकरणांची ही आकडेवारी 26 नोव्हेंबरपासून सर्वात कमी आहे. त्या दिवशी यामध्ये घट होण्याऐवजी 2927 ची वाढ नोंदली गेली होती. देशात आतापर्यंत 1.01 कोटी प्रकरणे समोर आली आहेत. यातील 97.39 लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 1.74 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 2.80 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser