आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 26 July News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:कोरोनाग्रस्तांची संख्या 14 लाख पार, 146 दिवसांत 5 लाख प्रकरणे समोर आली, उर्वरित 9 लाख रुग्ण फक्त 30 दिवसांत वाढले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला पोलिस कर्मचारीचा हा फोटो 19 जुलैचा आहे. तिने अलिकडेच कोरोनाला पराभूत केले. यानंतर इतर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दिल्लीतील एम्स येथे प्लाझ्मा दान केला
  • देशातील अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 69 हजारपेक्षा जास्त, 32 हजार पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा रविवारी 14 लाख पार झाला. सलग दोन वेळेस एक लाख रुग्णसंख्या होण्यास केवळ दोन दिवस लागले. देशात 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर एक ते पाच लाख रुग्ण होण्यास 146 दिवस लागले होते. मात्र केवळ 30 दिवसांत 5 ते 14 लाख रुग्ण झाले. म्हणजे आता दर दोन दिवसाला एक लाख रुग्ण वाढत आहे. आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या 14 लाख 3 हजार 400 झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 64.19% झाला आहे. प्रत्येत 100 रुग्णांपैकी 64 रुग्ण बरे होत आहेत. तर कोरोना मृत्यूदर 2.30% आहे. दर 100 रुग्णांपैकी 2 रुग्णांचा मृत्यू होत आहे.

देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 50 हजार 72 रुग्ण आढळले. तर 703 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी 37 हजार 125 रुग्ण बरे झाले. एका दिवसात रुग्ण बरे होण्याची ही सर्वात मोठी संख्या आहे. याआधी 23 जुलै रोजी 33 हजार 326 लोक बरे झाले होते. आतापर्यंत देशात एकूण 8 लाख 86 हजार पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइट नुसार आहे.

अपडेट्स...

आरोग्य मंत्रालयानुसार, मागील 24 तासांत देशात 48 हजार 661 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 705 रुग्णांचा मृत्यू झाला. आता देशात एकूण 13 लाख 85 हजार 522 प्रकरणे आहेत. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्णांवर उपचार सुरू असून 8 लाख 85 हजार 577 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत 32 हजार 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार 25 जुलैपर्यंत देशात 1 कोटी 62 लाख 91 हजार 331 कोरोना चाचणी घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी शनिवारी 4 लाख 42 हजार 263 चाचण्या घेण्यात आल्या.

कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आज लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यावेळी आवश्यक सेवा चालू राहतील.

100 वर्षीय आजीने दिली कोरोनाला मात

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे 100 वर्षांच्या पी. मंगम्मा यांनी कोरोनावर मात केली. त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. इतक्या वयाचा रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.