आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 26 October 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण; देशातील एकूण रुग्णसंख्या 79 लाख पार, 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्युदर 1% पेक्षा कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.19 लाखांपेक्षा जास्त मृत्यू, 71.33 लाख रुग्ण कोरोनामुक्त

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 79 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 79 लाख 9 हजार 49 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातील 71 लाख 33 हजार 993 लोक बरे देखील झाले आहेत. देशात सध्या 6 लाख 54 हजार 686 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 19 हजार 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारी पाहिली असता देशातील 14 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आहे. येथे 1% पेक्षा कमी मृत्यू दर आहे. सर्वाधिक मृत्यू दर पंजाब (3.14%) आणि महाराष्ट्रात (2.63%) आहे.

मिझोरम देशातील पहिले असे राज्य आहे, जिथे कोरोनामुळे अद्याप एकही मृत्यू झाला नाही. येथे आतापर्यंत 2,447 रुग्ण आढळले, परंतु राज्य सरकारने या संक्रमणावर मोठ्या प्रमाणात मात केली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोरोना पॉझिटिव्ह

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ट्विट मध्ये ते म्हणाले की, "मला कोरोनाची लागण झाली आहे. एसीम्प्टोमॅटिक आहे. मला पूर्णपणे निरोगी वाटत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी. मी घरातच क्वारंटाइन होऊन काम करत राहीन. RBIचे काम पहिल्यासारखे सामान्य राहिल. मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व टेलिफोनद्वारे माझे सर्व उप गव्हर्नर आणि इतर अधिकाऱ्यांशी जोडलेला राहील.''