आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 27 July News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 5 लाखाजवळ पोहोचली, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील रुग्णसंख्या 1-1 लाख पार; देशात आतापर्यंत 14.79 लाख प्रकरणे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो मुंबईच्या दादर भागातील आहे. येथे राहणार्‍या लोकांची तपासणी करण्यापूर्वी पीपीई किट परिधान करताना आरोग्य कर्मचारी.
  • देशात आतापर्यंत 32 हजार 866 जणांचा मृत्यू, 9 लाख 21 हजार 303 रुग्ण कोरोनामुक्त

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 14 लाख 79 हजार 263 झाली आहे. मागील 24 तासांत 24 हजार 244 नवीन रुग्ण आढळले. सध्या देशातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 5 लाखाजवळ पोहोचली आहे. देशात सध्या 4 लाख 95 हजार 57 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 9 लाख 50 हजार 347 झाली आहे. 24 तासांत 31 रुग्ण बरे झाले. दरम्यान देशात कोरोनामुळे आतापर्यंत 33 हजार 436 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे.

दुसरीकडे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील संक्रमितांची संख्या 1-1 लाख पार झाली आहे. येथे दररोज 5 ते 6 हजार नवीन रुग्णांची भर पडत आहे. आंध्र प्रदेशात सोमवारी 6,051 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत येथे 1,02,349 कोरोना रुग्ण आहेत. तर कर्नाटकात मागील 24 तासांत 5,324 नवीन रुग्णांची नोंद झाली. येथे आतापर्यंत 1,01,456 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

देशभरात चित्रपटगृहे आणि जिम सुरू करण्याची तयारी

यादरम्यान केंद्र सरकारने अनलॉक 3.0 साठीची तयारी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार अनलॉक 3.0 मध्ये चित्रपटगृहे आणि जिम उघडले जाऊ शकतात. काही अटी आणि नियमांसह सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र शाळा-महाविद्यालयावरील बंदी अद्यापही कायम राहू शकते.

अपडेट्स

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी 30 जुलै रोजी पक्षाच्या खासदारांसमोर कोरोनावर चर्चा करणार आहे. सोनिया गांधी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदारांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये कोरोनासोबतच देशातील सद्य राजकीय परिस्थितीवरही चर्चा होईल.

कर्नाटकचे माजी मंत्री राजा मदनगोपाल नाईक यांचे सोमवारी निधन झाले. ते मागील आठवड्यात कोरोनाबाधित आढळल्यानंतर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी 1983, 1985 आणि 1989 मध्ये शोरापुर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यांनी माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले.

ओडिशात सोमवारी 1503 नवीन रुग्णांची वाढ झाली. येथील गंजम जिल्ह्यात सर्वाधिक 491 रुग्ण आढळले. यासोबत राज्यातील संक्रमितांचा आकडा 26 हजार पार झाला आहे. राज्यात आजपर्यंत 171 लोकांचा मृत्यू झाला आहे.