आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 27 October 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:98 दिवसांनंतर 40 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले, रिकव्हरी रेट 90.19%; आतापर्यंत 79.44 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.19 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू, 6.27 लाख रुग्णांवर उपचार सुरू

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 79 लाख 44 हजार 128 झाली आहे. सोमवारी 32 हजार 932 रुग्णांची वाढ झाली. 98 दिवसांनंतर 40 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. याआधी 21 जुलै रोजी 39 हजार 170 रुग्णांचे निदान झाले होते.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 71 लाख 98 हजार 660 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत भारत जगातील 5 सर्वाधिक संक्रमित देशांमध्ये टॉपवर आहे. भारतात रिकव्हरी रेट 90% पेक्षा जास्त आहे. येथे प्रत्येक 100 रुग्णांमध्ये 90 लोक बरे होत आहेत. रिकव्हरीच्या बाबतीत ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथील रिकव्हरी रेट 89.65 टक्के आणि रशियाचा 74.48 टक्के आहे. सर्वात वाईट परिस्थितीत फ्रान्समध्ये आहे. येथे आतापर्यंत 9.69% रुग्ण बरे झाले आहेत.

देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 19 हजार 534 रुग्णांचा मृत्यू झाला. 113 दिवसांनंतर दुसऱ्यांदा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 500 पेक्षा आहे. याआधी 5 जुलै रोजी 421 मृत्यूंची नोंद झाली होती.

7 दिवसांत 1.18 लाख अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले

अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीतही चांगली घट पाहायला मिळाली. मागील एका आठवड्यात विक्रमी 1.18 लाख अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले. देशात सध्या 6 लाख 55 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू आहे. दररोज सरासरी 12 हजार अॅक्टीव्ह रुग्ण कमी होत आहेत.

कोरोना अपडेट्स

भारत बायोटेकने सोमवारी भुवनेश्वरमध्ये कोवाक्सिनची अंतिम चाचणी सुरू केली. यासाठी द इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (IMS), SMU सह देशातील 21 रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. याच रुग्णालयांत व्हॅक्सीनची अंतिम चाचणी होणार आहे.