आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 28 October 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमणाचा दर कमी झाला, परंतु सणासुदीच्या काळात 5 राज्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढली; आतापर्यंत 79.88 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाचा कोरोनामुक्तीचा दर 90.62 टक्क्यांवर

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे की संसर्गाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे, परंतु अद्याप हा धोका टळलेला नाही. ICMR चे डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी मंगळवारी कोविड-19चा साप्ताहिक अहवाल सादर केला.

ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. मंगळवारी दिल्लीत विक्रमी 4853 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत, एकाच दिवसात आढळलेल्या रुग्णांचा हा मोठा आकडा आहे. भार्गव म्हणाले की यावेळी प्रत्येकाने सतर्ग राहिले पाहिजे. बचावासाठी कोविड -19 नियमांचे पालन करावे लागेल. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि नीति आयोगाचे सदस्य उपस्थित होते.

कंटेनमेंट झोनमध्ये सक्त लॉकडाउन जारी राहील

दरम्यान, ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि लोक नवीन अनलॉक मार्गदर्शकाची वाट पाहत होते. केंद्राने मंगळवारी परिस्थितीचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, अनलॉक -5 अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे आता 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहतील.

गृह मंत्रालयाने म्हटले की, राज्यांत आणि राज्याबाहेर प्रवास करण्यावर कोणतेही बंधन घातले जाणार नाही आणि यासाठी स्वतंत्र मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. या कालावधीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाउन देखील सुरू राहील.

अॅक्टीव्ह रुग्णांत वेगाने घसरण जारी

देशात कोरोनाच्या अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वेगाने घट सुरूच आहे. सोमवारी यामध्ये 28 हजार 132 रुग्णांची घट झाली. ही आतापर्यंतची दुसरी मोठी घसरण आहे. याआधी 21 सप्टेंबर रोजी सर्वाधित 28 हजार 653 अॅक्टीव्ह रुग्ण कमी झाले होते.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 79 लाख 88 हजार 349 झाला आहे. यातील 72 लाख 56 हजार 588 रुग्ण बरे झाले असून 6 लाख 10 हजार 354 रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहे. देशाचा कोरोनामुक्तीचा दर हा 90.62 टक्क्यांवर गेला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 20 हजार 34 रुग्णांचा मृत्यू झाला.