आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 29 July News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 15.82 लाखांवर; तर 10.20 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात आतापर्यंत 15 लाख 82 हजार 581 रुग्ण झाले आहेत. बुधवारी 31,464 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, तर 767 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच देशातील एकूण मृतांचा आकडा 34,995 झाला आहे. सध्या देशात 5,26,912 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 10 लाख 20 हजार 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर उत्तराखंडमधील गंगोत्री धाम भाविकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे. यादरम्यान, तीर्थयात्री आल्यावर त्यांना 2 किलोमीटर आधीच थांबवले जाईल. मंदिर सिमितीचे अध्यक्ष सुरेश सेमवाल यांनी ही माहिती दिली.

देशभरातील नाइट कर्फ्यू हटवण्यात येईल, 5 ऑगस्टपासून योगा इंस्टिट्यूट्स आणि जिम उघडण्यास मंजूरी

गृहमंत्रालयाने अनलॉक-3 ची गाइडलाइन बुधवारी जारी केली आहे. गाइडलाइननुसार, रात्री फिरण्यावरील बंदी हटवण्यात आली आहे. यासोबतच 5 ऑगस्टपासून जिम आणि योग संस्थांना सुरू करण्यासही परवानगी असेल.

दिल्लीमध्ये आतापर्यंत 1 लाख 32 हजार 275 रुग्ण झाले आहेत. संक्रमणाच्या बाबतीत दिल्ली तिसऱ्या नंबरवर आहे, अॅक्टीव्ह रुग्णांच्या बाबतीत 10 व्या नंबरवर आहे.

मुंबईच्या झोपडपट्टीत 57% कोरोना संक्रमित

दिल्लीनंतर मुंबईमध्येही सीरो सर्वे सुरू झाला आहे. यातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील झोपडपट्टीमध्ये 57% लोक संक्रमित झाले आहेत. सीरो सर्वेमध्ये व्यक्तीच्या शरीरातील अॅंटीबॉडीची माहिती मिळते. मुंबईतील झोपडपट्टी व्यरिरीक्त परिसरातील 16% लोकांमध्ये अँडीबॉडी मिळाल्या आहेत.