आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 29 October 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:नवीन रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी 50 हजारांपेक्षा कमी राहिली, अॅक्टीव्ह रुग्णांमध्ये 26 व्या दिवशीही घट; आतापर्यंत 80.38 लाख प्रकरणे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले आहेत.
  • देशात बुधवारी 57 हजार 506 रुग्ण बरे झाले आणि 508 रुग्णांचा मृत्यू झाला

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येतील घसरण सुरूच आहे. बुधवारी 49 हजार 660 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी हा आकडा 50 हजारांपेक्षा कमी राहिला. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांमुळे अॅक्टीव्ह रुग्णांमध्ये 26 दिवशी देखील घट पाहायला मिळाली. बुधवारी 57 हजार 506 रुग्ण बरे झाले आणि 508 रुग्णांचा मृत्यू झाला.

तारीखनवीन रुग्ण
25 ऑक्टोबर45932
26 ऑक्टोबर36113
27 ऑक्टोबर43036
28 ऑक्टोबर49660

देशातील कोरोनारुग्णांची संख्या 80.38 लाख झाली आहे. अॅक्टीव्ह रुग्ण देखील 6 लाख 5 हजार 943 आहे. आतापर्यंत 72 लाख 92 हजार 156 लोक बरे झाले. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 20 हजार 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीच्या आकडेवारीने चिंता वाढवली

दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवशी कोरोनाचे 5673 रुग्ण वाढले. येथे मागील काही दिवसांपासून दररोज सुमारे 4000 रुग्ण आढळत आहेत.

तारीखरुग्ण
23 ऑक्टोबर4086
24 ऑक्टोबर4116
25 ऑक्टोबर4136
27 ऑक्टोबर4853
28 ऑक्टोबर5673

स्मृती इराणी कोरोना पॉझिटिव्ह

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विवरवरून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, 'एखादी घोषणा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, त्यामुळे मी सोप्या पद्धतीने सांगते - मला कोरोनाची लागण झाली असून, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करुन घ्यावी.'