आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात ७ महिन्यांत कोरोना दुष्टचक्रात महामारीमुळे एक लाखापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतात पहिला मृत्यू ११ मार्चला कर्नाटकात झाला होता. यानंतर २५,००० मृत्यू १२८ दिवसांत झाले. आता ७५,००० ते १ लाख मृत्यू होण्यासाठी केवळ २२ दिवस लागले आहेत. तथापि, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात ७२ देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. सध्या देशातील ०.५ % लोकसंख्येला कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारी ११ व्या दिवशी वाढीचा दर शून्यापेक्षा कमी आहे. हा दर सलग १४ दिवस शून्यापेक्षा खाली राहिल्यास हा कोरोनाचा पीक मानला जाईल.
मृत्युदर : देशात घट झाल्याने १.६%, रशियात वाढून १.८%
> मे मध्ये रशियात मृत्युदर १.०%, तर आता १.८% आहे. जास्त मृत्यू झालेल्या ३० देशांत हा दर २० सप्टेंबरपर्यंत सर्वात कमी होता. आता भारतात आहे. जगाचा सरासरी दर ३.०% आहे. म्हणजे, जवळपास भारताच्या दुप्पट.
पंजाबमध्ये १७५ देशांपेक्षा जास्त मृत्युदर
> देशातील सर्वाधिक ३% मृत्युदर पंजाबात आहे. मृत्युदरामध्ये सर्वाधिक घट महाराष्ट्रात होत आहे. केवळ पंजाब, महाराष्ट्र व गुजरातेत मृत्युदर २ % पेक्षा जास्त आहे, तर १८ राज्यांत मृत्युदर २ % पेक्षा कमी आहे
मृत्यू : लोकसंख्येनुसार भारतात ७१ देशांपेक्षा कमी
> भारतात प्रत्येकी १० लाखांपैकी ४,६२५ लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अमेरिका, ब्राझीलमध्ये ही सरासरी २२ हजारांपेक्षा जास्त आहे. युरोपातील जवळपास सर्व देशांत लोकसंख्येनुसार भारतापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्र, दिल्लीत १७९ देशांपेक्षा जास्त मृत्यू
> आंध्र (११२) व जम्मू-काश्मिरात (९०) लोकसंख्येनुसार राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त मृत्यू आहेत. बिहारची स्थिती १६२ देशांपेक्षा चांगली आहे. गुजरात(५०), हरियाणा (४८), मप्र (२८) मध्ये मृत्यू राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहेत.
शहर : संसर्ग जास्त असणाऱ्या ठिकाणच्या स्थितीत सुधारणा
> पुणे वगळता रिकव्हरीच्या बाबतीत शहरांच्या स्थितीत सातत्याने सुधारणा झाली आहे. मात्र, देशातील ६५% मृत्यू १५ शहरांमध्ये झाले आहेत. दिल्ली आणि अहमदाबादेत कोरोनाचा पीक आल्याचे मानले जात आहे.
मुंबईत मृत्यूंची सरासरी अमेरिकेपेक्षा जास्त
> अमेरिकेत प्रत्येकी १० लाख लोकसंख्येवर ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी शहरांच्या तुलनेत न्यूयॉर्कसह केवळ ११ शहरांमध्ये मृत्यूंची सरासरी महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. उर्वरित सर्व राज्ये/शहरांपेक्षा कमी आहे.
सिरो सर्व्हे; मंुबईच्या झोपडपट्ट्यांत संसर्गाचे प्रमाण १२%नी घटले
मुंबई | मुंबईच्या झोपडपट्ट्यांतून करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो -सर्व्हेमध्ये आधीच्या तुलनेत १२%हून कमी लोकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्या. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज आढळणे याचा अर्थ तो कधी ना कधी काेरोना विषाणूच्या विळख्यात सापडला होता. नव्या सिरो सर्व्हेमध्ये ४५% लाेकांमध्ये अँटिबॉडीज सापडल्या होत्या. मुंबई शहर पुण्यानंतर देशातील दुसरे सर्वाधिक संक्रमित शहर आहे. येथे सुमारे ९ हजार नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.