आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 3 September 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:वेगाने वाढताहेत कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण, 7 दिवसांत दर 1.11% वाढला; भारतात 9 हजार बाधित गंभीर, हा जगातील दुसरा मोठा आकडा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिनाभरात 2.32 लाख अॅक्टिव्ह रुग्णवाढ, रिकव्हरी रेट स्थिर

आठवडाभरापासून भारतात जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त सापडत असताना अॅक्टिव्ह रुग्णसंख्येतही वेगाने वाढ होत आहे. २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत अॅक्टिव्ह रुग्ण रोज १.५% च्या सरासरीने वाढून ७६,४३१ झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालये, होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात ०.३९% दराने १९,०९२ अॅक्टिव्ह रुग्ण वाढले होते. या रुग्णांच्या वृद्धिदरात अचानक १.११% ची वाढ काळजीचे कारण आहे. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर सलगपणे घटला तरच संसर्गाचा परिणाम कमी होईल.

महिनाभरात २.३२ लाख अॅक्टिव्ह रुग्णवाढ, रिकव्हरी रेट स्थिर

देशात ऑगस्टमध्ये २.३२ लाख रुग्ण वाढले. अमेरिका, ब्राझील व रशिया वगळता इतर देशांतील एकूण रुग्ण भारताच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा कमी आहेत

> गेल्या आठवडाभरात देशात रुग्ण बरे होण्याचा वेग मंदावला आहे. २६ आॅगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान रिकव्हरी रेट १.१ टक्केच वाढला. तथापि, त्याआधीच्या आठवड्यात रिकव्हरी रेटमध्ये २.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

भारतात ९ हजार बाधित गंभीर, हा जगातील दुसरा मोठा आकडा

> भारतात ८,९४४ कोरोना रुग्ण गंभीर आहे. अमेरिकेत ही संख्या सर्वाधिक आहे.

> १ सप्टेंबरला अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सुमारे ०.३३ टक्के व्हेंटिलेटरवर होते. २.०१% रुग्णांना आयसीयूत आणि ३.३५% रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले.

> ३० जानेवारीपासून १ सप्टेंबरपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ४८८ कोरोना रुग्ण ऑक्सिजन बेडवर भरती झाले. १ लाख १४ हजार २८१ आयसीयूत राहिले, तर ३३ हजार ४२९ बाधितांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

अॅक्टिव्ह रुग्णांचा रुग्णालयांवर परिणाम, सध्या अशी आहे स्थिती...

> कोविड रुग्णालये - १,६०७
९० केंद्र व १५१७ राज्यांची. ३.९१ लाख बेड्स आहेत. १.१६ लाख ऑक्सिजन सपोर्ट व ३२,४८१ आयसीयू बेड आहेत.

> कोविड हेल्थ सेंटर- ३,५४३

८५ केंद्र व ३,४५८ राज्यांची. ३.१३ लाख बेड्स. ७८ हजार ऑक्सिजन सपोर्ट आणि १९,३१६ आयसीयू बेड्स आहेत.

> कोविड केअर सेंटर-११,६९१

या सेंटर्समध्ये एकूण बेड्सची संख्या १० लाख ८४ हजार १८३ इतकी आहे.

कोरोना लसीसाठीच्या जागतिक प्रयत्नांत अमेरिका सहभागी नाही

> डब्ल्यूएचओसोबत कोरोना लस निर्मितीच्या जागतिक प्रयत्नांत अमेरिका सहभागी होणार नाही. व्हाइट हाऊसने ही घोषणा केली. डब्ल्यूएचओने चीनशी संगनमत करून कोरोना संबंधी माहिती लपवल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

> जगभरात ३६ लसी सध्या मानवी चाचण्यांच्या टप्प्यांत आल्या आहेत. दुसरीकडे प्री-क्लिनिकल ट्रायलअंतर्गत प्राण्यांवर ९० लसींची चाचणी सुरू आहे. यात काही प्रमुख भारतीय लसींचाही समावेश आहे.

> भारतात विकसित पहिली स्वदेशी लस को-व्हॅक्सिन सध्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. चाचणीचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर डॉ. ई. व्यंकट राव यांच्यानुसार, सुरुवातीच्या चाचण्यांत लसीचे साइड इफेक्ट्स आढळले नाहीत.