आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 30 August News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना अपडेट:एकूण रुग्णसंख्या 36.13 लाखांवर; तमिळनाडुत 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन वाढला

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सर्वाधिक 16 हजार 408 नवीन रुग्णांची नोंद, तर 296 मृत्यू

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 36,13,023 झाला आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 70 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी देशभरात 73,310 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 875 पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशभरातील 7,80,013 रुग्णांवर उपचार सुरू असून, 27,67,884 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

यादरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे तमिळनाडुतील लॉकडाउन 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांनी रविवारी लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, रविवारी लॉकडाउनमध्ये सूट असेल.

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 7,80,689 झाला आहे. रविवारी 16,408 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 296 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 1,93,548 रुग्णांवर उपचार सुरू असून, 5,62,401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान, 24,399 रुग्णांचा मृत्यू झाला.

मागील 15 दिवसांत एखूण 10.80 लाख रुग्ण आढळले, 9 लाखांपेक्षा जास्त बरे झाले आणि 14 हजार 500 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये फक्त 95 हजारांचा वाढ झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. देशात आता दर 10 लाख लोकसंख्येत 29 हजार 234 लोकांची कोरोना चाचणी होत आहे. यात 2516 लोक संक्रमित सापडतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser