आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 31 August 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:रविवारी आढळले 80,078 नवे रुग्ण; भारतात सलग दुसऱ्या दिवशी जगातील आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याआधी अमेरिकेत सर्वाधिक 78,586 कोरोना रुग्ण आढळले होते

भारतात कोरोना संसर्ग नव्या स्तरावर गेला आहे. शनिवारी 78,751 नवे रुग्ण समोर आले होते. ही कुठल्याही देशात एका दिवसात आढळलेल्या रुग्णांची आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी सलग दुसऱ्या दिवशी देशात जगातील आतापर्यंतचे विक्रमी 80,078 नवे रुग्ण आढळले. याआधी अमेरिकेत 24 जुलैला जगात सर्वाधिक 78,586 रुग्ण आढळले.

रविवारी सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमितांची एकूण संख्या 36,12,164 झाली आहे. 958 नव्या मृत्यूंसह कोरोनामुळे आतापर्यंत देशात 64,536 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्युदर 1.79% राहिला आहे. आतापर्यंत 27,65,540 रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट 76.56% आहे. महाराष्ट्रात रविवारी 16,408 रुग्ण आढळले. तेथे चार दिवसांत 60 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात एकूण संक्रमित 7.8 लाखांवर गेले आहेत. कोणत्याही देशाच्या कोणत्याही राज्यात ही रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात 7 लाख रुग्ण आहेत. रविवारी आंध्र प्रदेशात 10,603, कर्नाटकात 8,852, तामिळनाडूत 6,495, यूपीत 6,175 आणि दिल्लीत 2,024 नवे रुग्ण आढळले. देशात 24 तासांत प्रथमच विक्रमी 10.55 लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या.

अमेरिकेत 78,586 रुग्णसंख्या आतापर्यंत सर्वोच्च, 37 दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या घटतेय

> अमेरिकेत आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 78,586 नव्या रुग्णांचा आकडा सर्वोच्च राहिला.

> त्यानंतर 37 पैकी 36 दिवसांत नव्या रुग्णांचा आकडा 70 हजारांच्या वर गेला नाही.

> अमेरिकेत नव्या रुग्णांच्या संख्येत सतत घट. शनिवारी तेथे 42,843 रुग्ण आढळले

> भारतात शनिवारी जगाच्या सर्वाधिक रुग्णांच्या दुसऱ्या दिवशी आकडा पुन्हा नव्या उंचीवर गेला.

> अमेरिकेत गेल्या एक आठवड्यात रोज सरासरी 42,521 रुग्ण समोर आले.

भारतात गेल्या सात दिवसांदरम्यान रोज सरासरी 70,896 नवे रुग्ण आढळले. ही कोणत्याही देशात आढळणाऱ्या रुग्णांची सात दिवसांची सर्वाधिक सरासरी आहे. भारतात संक्रमितांचा आकडा वाढण्याचा दर 2.32% आहे, अमेरिकेत हा दर फक्त 0.65% आहे.

भारतात रोज रुग्णवाढीचा दर, ब्राझीलपेक्षा दुपटीने अधिक

अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक संसर्ग झाला आहे.परंतु ब्राझीलच्या तुलनेत भारतात रुग्णवाढीचा दर दुपटीपेक्षाही अधिक आहे. ब्राझीलमध्ये पंधरवड्यापासून ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत.

भारत आणि ब्राझील रुग्णवाढीची तुलना

> ब्राझीलमध्ये भारतापेक्षा 30-40 हजार रुग्ण कमी आढळत आहेत. 10-12 दिवसांत भारत दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो.

तामिळनाडूत 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन, हरियाणात २ दिवस बाजार बंद ठेवण्याचा आदेश रद्द

> कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तामिळनाडूमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात अाले आहे. हरियाणात सोमवार आणि मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. केंद्राने अनलॉक-४ मध्ये राज्यांना लॉकडाऊनचा अधिकार दिलेला नाही,असे गृहमंत्री अनिल वीज यांनी सांगितले.

> महाराष्ट्रात आणखी १६१ पोलिसांना संसर्ग झाला अाहे. राज्यात आतापर्यंत १४,९५३ पोलिस बाधित झाले असून त्यापैकी १५४ जणांचा मृत्यू झाला अाहे.

> २ कर्मचारी, खासगी सुरक्षा अधिकाऱ्यासह इतर लोक बाधित झाल्याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वत: ४ दिवस अलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला, तर राजस्थानचे परिवहनमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

> दिल्लीत साप्ताहिक हाट बाजार चाचण्यांनंतर खुले होतील,तर हैदराबादच्या राजेंद्रनगरमध्ये बाधितांच्या देखभालीसाठी मस्जिद-ए-मुस्तफाचे कम्युनिटी सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.