आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 31 July News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:संक्रमितांचा एकूण आकडा 16.90 लाखांवर; शुक्रवारी 50,900 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 32 हजारां पेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो दिल्लीचा आहे. गुरुवारी येथे 1 हजाराहून अधिक लोकांचे नमुने घेण्यात आले.
Advertisement
Advertisement

शुक्रवारी देशात 50,970 पेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 32 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील संक्रमितांचा एकूण आकडा 16 लाख 90 हजार 546 झाला असून, आतापर्यंत 36,497 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 5,62,605 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10,90,018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे.

दुसरीकडे, कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत भारत आता इटलीला मागे टाकत 5 व्या स्थानावर आला आहे. वेबसाइट worldometers नुसार शुक्रवारी सकाळपर्यंत भारतात कोरोनामुळे 35 हजार 786 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये सर्वात पुढे अमेरिका (1 लाख 54 हजार 963), ब्राझील (91 हजार 263), ब्रिटन (45 हजार 999), आणि मेक्सिको (45 हजार 361) आहे. इटलीत कोरोनामुळे 35 हजार 132 मृत्यू झाले आहेत.

कोरोना अपडेट्स

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी आपली आकडेवारी जारी केली. मागील 24 तासांत 55 हजार 79 प्रकरणे समोर आली. तर 779 लोकांचा मृत्यू झाला. आता देशात 16 लाख 38 हजार 871 प्रकरणे झाली आहेत. यापैकी 5 लाख 45 हजार 318 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 10 लाख 57 हजार 806 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 35 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने शुक्रवारी सांगितले की, 30 जुलैपर्यंत देशात 1 कोटी 88 लाख 32 हजार 970 नमुन्यांची तापसणी झाली. तर गुरुवारी देशात 6 लाख 42 हजार 588 चाचण्या झाल्या. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

Advertisement
0