आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 4 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:एका आठवड्यानंतर पुन्हा 50 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले, दोन आठवड्यानंतर मृतांचा आकडा 700 पार; 11 राज्यांमध्ये अॅक्टीव्ह रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र दिल्लीतील आनंद विहार बसस्थानकाचे आहे. येथे ही व्यक्ती रॅपिड अँडीबॉडी टेस्टसाठी आपल्या नंबरची वाट पाहत आहे. गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
  • देशातील कोरोना रुग्णांची संख्या 86.63 लाख पार, आतापर्यंत 1.24 लाख मृत्यू

देशात कोरोनाच्या आकडेवारीत किंचित वाढ झाली आहे. सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा नवीन रुग्णांचा आकडा 50 हजार पार झाला आहे. बुधवारी 50 हजार 465 रुग्ण आढळले. याआधी 28 ऑक्टोबर रोजी 50 हजार 188 रुग्ण आढळले होते. दरम्यान मृतांचा आकडा देखील 704 राहिला. मागील 15 दिवसांतील ही मोठी आकडेवारी आहे. याआधी 21 ऑक्टोबर रोजी 701 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

15 दिवसानंतर एका दिवसात 700 हून अधिक मृत्यू

राज्य4 नोव्हेंबरला झालेले मृत्यू
महाराष्ट्र300
पश्चिम बंगाल55
दिल्ली51
कर्नाटक34
तमिळनाडू

30

देशातील एकूण रुग्णसंख्या 83 लाख 63 हजार 412 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 लाख 10 हजार 630 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 24 हजार 354 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 5 लाख 25 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात आजपर्यंत 11.39 कोटींपेक्षा जास्त लोकांची चाचणी झाली आहे. प्रत्येक 10 लाख लोकांमागे टेस्टिंगचा आकडा आता 81 हजार 883 झाला आहे. चांगली गोष्ट अशी की देशात आता 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत जिथे इतक्याच लोकांमागे यापेक्षाही लोकांची तपासणी केली जात आहे. यांपैकी 3 राज्य असे आहेत जेथे 10 लाख लोकांमागे 2 लाखांपेक्षा जास्त, 11 राज्यांमध्ये 1 लाखपेक्षा जास्त आणि इतर 11 राज्यांमध्ये 81 हजार 883 ते 1 लाख पर्यंत चाचण्या होत आहेत.

11 राज्यांमध्ये अॅक्टीव्ह रुग्ण वाढले

केरळ, दिल्ली, तेलंगाणा, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूर, चंढीगड आणि लडाख मध्ये बुधवारी अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. सर्वाधिक छत्तीसगडमध्ये 1003, दिल्लीत 994, तेलंगाणात 358 आणि केरळमध्ये 282 अॅक्टीव्ह रुग्ण वाढले.