आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 4 November LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशात आता फक्त 4.34% अॅक्टीव्ह रुग्ण, याबाबतीत भारत जगात दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर आला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगातील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांच्या 4.34% रुग्ण भारतात आहेत
  • देशातील 4 राज्यांत पुन्हा वाढताहेत रुग्ण

देशातील अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत एका महिन्यापासून घसरण होत आहे. याबाबतीत भारत आता दुसऱ्यावरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारतात सध्या 4.34% रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 26% सोबत अमेरिका पहिल्या आणि 11% सोबत फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटली आणि बेल्जियम देखील टॉप-5 देशांमध्ये समाविष्ट आहेत.

जगातील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांच्या 4.34% रुग्ण भारतात

देशअॅक्टीव्ह रुग्ण
अमेरिका26%
फ्रान्स11%
भारत4.34%
इटली3.40%
बेल्जियम3.33%

आकडेवारी worldometers.info नुसार आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 83 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 83 लाख 12 हजार 947 लोक पॉझिटिव्ह आढळले. दिलासादायक बाब म्हणजे यातील 76 लाख 54 हजार 757 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 23 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या 5 लाख 3 हजार 27 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4 राज्यांत पुन्हा वाढताहेत रुग्ण

मणिपूर, दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मणिपूरमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला 2000 अॅक्टीव्ह रुग्म होते ते आता 3500 झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत 26 हजारांवर वाढून 33 हजार, केरळमध्ये 77 हजारांवरून 86 हजार आणि पश्चिम बंगालमध्ये 26 हजारांवरून 36 हजारांवर अॅक्टीव्ह रुग्ण झाले आहेत. ही संख्या रोखण्यासाठी चाचण्या, ट्रेसिंसग आणि उपचारावर लक्ष केंद्रित करावे लागेल. भूषण यांनी सांगतिले की, संक्रमणाचा एकूण पॉझिटिव्हिटी दर 8% वरून 7.4 झाला आहे.