आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 6 Octorber News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:26 दिवसांत अॅक्टिव्ह रुग्ण सर्वात कमी, आता 9.19 लाख रुग्ण, मृतांचा आकडा सलग तिसर्‍या दिवशीही 1000 च्या खाली आला; आतापर्यंत 66.82 लाख प्रकरणे

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 24 तासांत 59 हजार 893 नवीन रुग्णांची नोंद, तर 75 हजार 657 रुग्णांना डिस्चार्ज
  • देशात आतापर्यंत 1.09 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

देशात कोरोनाच्या वेगात प्रचंड घट झाली आहे. गेल्या 26 दिवसांत, अॅक्टीव्ह रुग्ण सर्वात खालच्या स्तरावर खाली आले आहे. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 10.17 लाखांवरून 9.19 लाखांवर आली आहे. देशात सध्या 9 लाख 18 हजार 429 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात मागील 24 तासांत 59 हजार 893 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यासोबतच संक्रमितांची एकूण संख्या 66 लाख 82 हजार 73 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे यातील 56 लाख 59 हजार 110 लोक बरे झाले आहेत. सोमवारी 75 हजार 675 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर 885 रुग्णांचा मृत्यू झाला. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1 हजार पेक्षा कमी झाली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एका महिन्यात 88 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण घटले

आकडेवारी पाहिल्यास मागील एका महिन्यात 4 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत देशात 28.77 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. 27.91 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 37 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे, बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे, सक्रिय रूग्णांची संख्या म्हणजेच सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे.

1 महिन्यात असे 88 हजार 566 अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले. एक वेळ होती की, अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 10 लाख 18 हजारांपर्यंत पोहचली होती. आता ती घटून 9.19 लाखांवर आली आहे.

देशातील चाचणीची संख्या 8 कोटींपेक्षा जास्त

देशात कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी पार झाली आहे. आतापर्यंत 8.09 कोटी चाचण्या करण्यात आल्या. आयसीएमआरनुसार प्रत्येक राज्यात दररोज 10 लाख लोकसंख्येत 140 पेक्षा जास्त चाचण्या केल्या जात आहेत. डब्ल्यूएचओच्या किमान मर्यादेपेक्षा हे सहा पट जास्त आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की बर्‍याच राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक तपास केला जात आहे.