आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 7 July 2020 News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशात कोरोना:देशात प्रती 100 चाचण्यांमागे 10 रुग्ण, अमेरिकेपेक्षाही जास्त; आधी 4 मिळायचे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात १ काेटी काेराेना चाचण्या पूर्ण, रुग्णसंख्या ७ लाखांवर
  • देशात रुग्णांची संख्या जितक्या वेगाने वाढली तशा चाचण्या नाही
Advertisement
Advertisement

देशाने साेमवारी एक काेटी काेराेना चाचण्यांचा टप्पा आेलांडला. साेमवारी दुपारी १२ वाजता देशात एकूण १ काेटी १८ हजार चाचण्या झाल्या. दुसरीकडे रुग्णांची संख्याही ७ लाखांच्या पार गेली  आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशात आता दर १०० चाचण्यांमध्ये १० रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण अमेरिकेपेक्षाही (८ रुग्ण) जास्त आहे. देशात सुरुवातीला १ लाख रुग्ण हाेते तेव्हा हे प्रमाण फक्त ४.३४ % हाेते. याचा अर्थ त्या वेळी दर १०० चाचण्यांमध्ये फक्त ४ रुग्ण मिळत हाेते.  जागतिक आराेग्य संघटनेने ५ % पेक्षा जास्त प्रमाण असलेल्या देशांना धाेकादायक श्रेणीत ठेवले आहे.

जगात आपण कुठे?

इंग्लंडमध्ये संसर्गाचे प्रमाण सर्वात कमी, कारण तेथे आजवर १५.४७%  लाेकसंख्येच्या चाचण्या झाल्या आहेत, भारतात केवळ ०.७२ टक्केच 

> सर्वात जास्त रुग्ण असलेल्या या १० देशांत ब्राझीलमध्ये चाचण्यांचे प्रमाण संसर्गाच्या तुलनेत सर्वात जास्त ४८%.

> लाेकसंख्येचा विचार करता मेक्सिकाेची परिस्थिती सर्वात वाईट आहे. भारताची परिस्थितीही मेक्सिकाेसारखीच आहे.

पाकिस्तानचा दावा खाेटा ठरला 

१५ दिवसांपासून चाचण्या न वाढवता म्हणताेय- अत्युच्च बिंदू आला, पण संसर्गाचे प्रमाण १६,३२% वर गेले आहे

> चाचणीच्या प्रमाणात संसर्गाचे प्रमाण ५% पेक्षा जास्त असेल तर कोरोना अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याचे समजावे, असे डब्ल्यूएचआे म्हणते. पाकिस्तानात २.३१  लाख रुग्ण आहेत. केवळ १४.२० लाख चाचण्या घेतल्या. एवढ्याच तामिळनाडूत झाल्या आहेत.

देशात ८५% रुग्णसंख्येच्या ११ राज्यांची स्थिती

दिल्लीत सर्वाधिक ३.८३% लाेकसंख्येच्या चाचण्या झाल्या, महाराष्ट्रात फक्त ०.९९%

> १.११ लाख रुग्णसंख्येच्या तामिळनाडूमध्ये भारतातील सर्वाधिक १३.५१ लाख चाचण्या, २ लाखांपेक्षा जास्त रुग्णांच्या महाराष्ट्रात ११.१६ लाखच चाचण्या.

> लाेकसंख्येनुसार बिहार व यूपीत सर्वात कमी चाचण्या झाल्या. १२ हजार रुग्णांच्या बिहारमध्ये आतापर्यंत फक्त २.५७ लाख चाचण्या झाल्या आहेत.

Advertisement
0