आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 9 August 2020 News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना अपडेट:देशातील रुग्णांचा आकडा 22 लाखांच्या पुढे, यातील 15 लाखांपेक्षा जास्त संक्रमित ठीक झाले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी 22 लाखांच्या पुढे गेला आहे. चिंतेची बाब म्हणजे, रविवारी 80 हजारांपेक्षा जास्त संक्रमित वाढले आहेत. आतापर्यंत देशात 22 लाख 5 हजार 892 पॉझिटिव्ह केसेस आहेत. परंतू, चांगली बाब म्हणजे, देशभरात 15 लाख 15 हजार 343 लोक ठीक झाले आहेत. सध्या देशात 6 लाख 39 हजार 246 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

यादरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री बी श्रीरामुलु यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते रुग्णालयात भरती आहेत. श्रीरामुलु कर्नाटक सरकारमधील पाचवे संक्रमित मंत्री आहेत. यापूर्वी स्वतः मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय वन मंत्री आनंद सिंह, पर्यटन मंत्री सीटी रवी आणि बीसी पाटिलवर यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. याशिवाय मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विश्वास सारंगदेखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सध्या सारंग यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे.

महाराष्ट्रात 5.15 लाख पॉझिटिव्ह

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांचा एकूण आकडा 5 लाख 15 हजार 532 झाला आहे. रविवारी 12,248 नवीन रुग्णांची वाढ झाली, तर 13,348 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 1,45,558 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 3,51,710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत 17,757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

अपडेट्स...

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सलग सुधारणा होत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 68.32% झाला आहे. तर मृत्यू दर 2.04% आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 87 हजार 171 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
  • केंद्रीय कृषि राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोघांनीही ट्विट करून ही माहिती दिली.
  • गुजरात, केरळ, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये मागील 24 तासांत जितके नवे रुग्ण आढळले, त्यापेक्षा जास्त बरे झाले आहेत. याशिवाय दादरा नगर हवेली, चंदीगड आणि मिझोरममध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सारखीच राहिली.
बातम्या आणखी आहेत...