आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths 9 September News And LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोनाचा कहर:एका दिवसात 1 लाख रुग्ण, तर बळींचा आकडा 1,532 वर; पहिल्यांदाच दिवसभरात 89,446 रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही एकाच दिवसात भारतातीलच नव्हे, तर जगातील आजवरची विक्रमी रुग्णवाढ
  • देशातील रिकव्हरी रेट 77.73% तर मृत्युदर 1.69%

भारतात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. देशात मंगळवारी दिवसभरात एक लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळले. ही एकाच दिवसात भारतातीलच नव्हे, तर जगातील आजवरची विक्रमी रुग्णवाढ आहे. भारतात ३० जानेवारीला पहिला रुग्ण आढळला होता. त्याच्या २३२ दिवसांत भारतात हा कहर झाला आहे.

आजवर देशामध्ये ४३ लाख ५५,६८० जणांना कोरोना झाला आहे. चारच दिवसांत त्यात साडेतीन लाखांची भर पडली. काळजीची बाब म्हणजे, २४ तासांत १,५३२ मृत्यू झाले. दिलासा म्हणजे, मंगळवारी ८९,४४६ रुग्ण बरे झाले. मृत्यू व कोरोनामुक्तांचा हा आकडाही उच्चांकी आहे. एकूण ७३,८२८ बळी आणि मृत्युदर १.६९% आहे. कोरोनामुक्तांची संख्या ३३ लाख ८६,०६५ व रिकव्हरी रेट ७७.७३% आहे. आयसीएमआरनुसार, २४ तासांत १० लाख ९८,६२१ कोरोना चाचण्याही झाल्या आहेत. आजवर देशात एकूण ५ कोटींपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.

सर्वाधिक वाढीचे ४ दिवस

> 4 सप्टेंबर 87,115

> 5 सप्टेंबर 89,954

> 6 सप्टेंबर 92,406

> 8 सप्टेंबर 1,04789

२ लाखांवर रुग्ण असलेला पुणे हा पहिलाच जिल्हा

> २ लाखांवर रुग्ण असलेला पुणे देशातील पहिला जिल्हा बनला आहे. येथे महिनाभरात रुग्ण दुप्पट झाले. रुग्णवाढीचा दर २२% वर गेला आहे.