आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths News And Updates; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

देशातील कोरोनाचा वेग सर्वात जास्त:21 दिवसात रुग्णांचा आकडा 10 वरुन 20 लाखांवर पोहचला; अमेरिकेत 41 तर ब्राझीलमध्ये 27 दिवस लागले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या दहा लाख रुग्णांपर्यंत 1.3 कोटी टेस्टिंग झाल्या, मागील 20 दिवसात 90 लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या

भारतातील कोरोना संक्रमितांचा आकडा 20 लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशात 20 लाख 16 हजार 984 रुग्ण आहेत. गुरुवारी(दि.6) देशभरात 53,745 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली, तर 800 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशभरात आतापर्यंत 41,540 पेक्षा जास्त रुग्णांनी जीव गमवला आहे. चांगली बाब म्हणजे, देशातील एकूण रुग्णांपैकी 13,71,225 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 6,03,767 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, देशातील 20 रुग्णांपैकी 10 लाख रुग्ण फक्त 21 दिवसात वाढले आहे. म्हणजे, दररोज अंदाजे 47 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढले. आता जगातील भारत, ब्राझील आणि अमेरिकेत 20 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 10 लाखांवरुन 20 लाखांवर येण्यासाठी भारताला सर्वात कमी वेळ लागला. तर, अमेरिकेत 41 दिवसात आणि ब्राझीलमध्ये 27 दिवसात रुग्ण वाढले. भारतात मागील आठ दिवसांपासून दररोज 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहे. या वेगाने पुढील 21 दिवसात भारतात 30 लाखांपेक्षा जास्त रुग्ण असतील.

एकूण चाचण्यांच्या 42% मागील 20 दिवसात झाल्या, 50% नवीन रुग्ण वाढले

देशात 5 ऑगस्टपर्यंत 2.20 कोटींपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील 20 दिवसातच 90 लाखांपेक्षा जास्त टेस्टिंग आहेत. म्हणजेच, एकूण चाचण्यांच्या 42% चाचण्या मागील 20 दिवसात झाल्या. यादरम्यान, 10 लाख नवीन रुग्ण सापडले.

अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात अग्नितांडव, 8 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू

अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील एका कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत 8 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. यानंतर 30 पेक्षा अधिक रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...