आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases And Deaths08 November 2020 LIVE News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today Mumbai Delhi Coronavirus News

देशात कोरोना:देशात अॅक्टीव्ह रुग्णांत सलग 51 व्या दिवशी घसरण, सध्या 5.11 लाख रुग्णांवर उपचार सुरू; यातील निम्मे फक्त 4 राज्यांत

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण रुग्णसंख्या 85.07 लाख, तर 1.26 लाख रुग्णांचा मृत्यू

दिल्ली, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत सलग 51 व्या दिवशी घसरण कायम आहे. 17 सप्टेंबरनंतर एकदाही अॅक्टीव्ह रुग्ण वाढले नाहीत. देशात सध्या 5.11 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 2.57 लाख रुग्ण महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आहे. महाराष्ट्रतही अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खाली आली आहे.

देशात शनिवारी 46 हजार 153 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 257 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबत देशातील एकूण रुग्णसंख्या 85.07 लाख झाली आहे. शनिवारी 57 हजार 582 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासोबत कोरोनामुक्तांची संख्या 78.67 लाख झाली आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1.26 लाख रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना अपडेट्स

ओडिशात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख पार झाली आहे. राज्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 140 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ओडिशा आतापर्यंत 2 लाख 85 हजार 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्र सरकारने पुढील वर्षी हज यात्रेला जाणाऱ्यांसाठी कोविड-19 ची निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य केली आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी शनिवारी ही माहिती दिली. हजला जाण्याच्या 72 तासांपूर्वी सर्व प्रवाशांना कोविड-19 ची चाचणी करावी लागेल असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...