आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:एका आठवड्यात देशात 6.50  लाख नवीन संक्रमित आढळले, हे अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत दुप्पटीने जास्त, भारतात आतापर्यंत 50.18 लाख प्रकरण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात मंगळवारी 1283 रुग्णांचा मृत्यू झाला, आतापर्यंत 82 हजार 103 रुग्णांनी गमावला जीव
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त 19 हजार 423 रुग्ण आढळले आणि 19423 रुग्ण बरेही झाले

देशात कोरोनाचे केस 50 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. रोज 80 ते 97 हजारांच्या जवळपास रुग्ण समोर येत आहेत. हाच आकडा राहिला तर नोव्हेंबरपर्यंत एक कोटी केस होतील. गेल्या एका आढवड्यावर नजर टाकली तर जगात सर्वात जास्त प्रकरण हे भारतात समोर आले आहेत.

जगातील तीन सर्वात प्रभावित देश अमेरिका, भारत आणि ब्राझीलचे 9 ते 15 सप्टेंबरपर्यंतचे आकडे पाहिले तर यादरम्यान देशात 6 लाख 50 हजार 594 रुग्ण समोर आले. तर अमेरिकेत 2 लाख 58 हजार 001 आणि ब्राझीलमध्ये 2 लाख 24 हजार 175 पॉझिटिव्ह आढळले आहेत. यादरम्यान संपूर्ण जगात 19 लाख 54 हजार 640 संक्रमित वाढले. तिकडे जगात आज कोरोना रुग्णांचा आकडा 3 कोटींच्या पार गेला जाईल.

सर्वात संक्रमित 3 देशांमध्ये गेल्या सात दिवसांचा आकडा

तारीकभारतअमेरिकाब्राझील
9 सप्टेंबर955363524634208
10 सप्टेंबर967623924840431
11 सप्टेंबर976554663244215
12 सप्टेंबर944143929131880
13 सप्टेंबर932203305019597
14 सप्टेंबर819113808719089
15 सप्टेंबर910963644734755
एकूण650594268001224175

देशात कोरोना रुग्णांचा आकडा मंगळवारी 50 लाखांच्या पार गेला. आतापर्यंत 50 लाख 20 हजार 319 संकमित आढळले आहेत. गेल्या 24 तासांच्या आत 91 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.