आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:जगात आता सर्वात जास्त वेगाने भारतात होत आहेत मृत्यू, रोज जवळपास 1100 लोक गमावत आहेत जीव, आज एकूण आकडा 1 लाखांच्या पार होणार; आतापर्यंत 63.91 लाख केस

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात रूग्णांनी 14 लाखांचा आकडा ओलांडला आहे आणि आंध्र प्रदेशात 7 लाखांच्या पार केला आहे, हे देशातील एकूण संक्रमितांपैकी 32.87% आहे
  • गुरुवारी देशात 81,693 संक्रमित आढळले आणि 78,646 रिकिव्हर झाले; 1096 लोकांचा मृत्यू झाला

देशातील कोरोना रूग्णांची संख्या वाढून 63 लाख 91 हजार 960 झाली आहे. गुरुवारी 81,693 नवीन रुग्ण आढळले आणि 78,646 लोक बरे झाले. 1096 जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या वाढून 99 हजार 804 झाली आहे.

भारतात आता संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. येथे दररोज सरासरी 1100 लोक आपला जीव गमावत आहेत. जर हा वेग कायम राहिला तर आज हा आकडा 1 लाखांच्या पुढे जाईल. दुसरीकडे, अमेरिका आणि ब्राझीलमध्ये मृत्यूचा आलेख झपाट्याने कमी होऊ लागला आहे. दररोज सरासरी 800 रुग्णांचा मृत्यू होत आहे.

देशात 9 लाख 42 हजार 585 रूग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सुमारे 9 हजार लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. 53 लाख 48 हजार 653 रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट देखील 10 दिवसांत 80% वरून 83.67% पर्यंत वाढला. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहेत.

महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 14 लाख, आंध्र प्रदेशात 7 लाख रूग्ण
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी हा आकडा 14 लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत 14 लाख 922 लोकांना संसर्ग झाला आहे. आंध्र प्रदेशातही 7 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत येथे 7 लाख 235 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

बातम्या आणखी आहेत...