आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:सोमवारी आढळले मागील 42 दिवसातील सर्वात कमी 1.95 लाख संक्रमित, तर 3.26 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुःखद बाब म्हणजे, सोमवारी 3496 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होत आहे. सोमवारी देशभरात 1 लाख 95 हजार 685 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली. हा आकडा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 13 एप्रिलला 1 लाख 85 हजार 306 रुग्ण आढळले होते.

देशातील मृतांचा आकडा सरकार आणि देशातील लोकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. देशात सोमवारी 3,496 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 26 हजार 671 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत 1 लाख 34 हजार 572 ने घट झाली आहे.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी

  • सोमवारी नवीन संक्रमित आढळले: 1.95 लाख
  • सोमवारी ठीक झाले: 3.26 लाख
  • सोमवारी झालेले मृत्यू: 3,496
  • आतापर्यंत झालेले संक्रमित: 2.69 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.40 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.07 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 25.81 लाख
बातम्या आणखी आहेत...