आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 23 May

कोरोना देशात:35 दिवसानंतर नवीन संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांपेक्षा कमी, 3.54 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 2.40 लाख संक्रमितांची नोंद, तर 3736 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशभरात 2 लाख 40 हजार 766 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. देशात 35 दिवसानंतर संक्रमितांचा आकडा 2.5 लाखांच्या खाली आला. यापूर्वी, 16 एप्रिलला 2 लाख 34 हजार 2 रुग्ण सापडले होते.

दरम्यान, या महामारीमुळे मृत्यू होण्याचा आकडा चिंताजनक आहे. शनिवारी कोरोनामुळे 3,736 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे, या काळात 3 लाख 54 हजार 825 रुग्ण ठीकही झाले. यामुळे अॅक्टीव्ह केसेसमध्ये एक लाख 17 हजार 877 ची घट झाली आहे. सध्या देशभरात 28 लाख 403 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी

शनिवारी रुग्ण आढळले: 2.40 लाख शनिवारी ठीक झाले: 3.54 लाख शनिवारी झालेले मृत्यू: 3,736 एकूण संक्रमित: 2.65 कोटी आतापर्यंत ठीक झाले: 2.34 कोटी एकूण मृत्यू: 2.99 लाख

बातम्या आणखी आहेत...