आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 26th May 2021

कोरोना देशात:मंगळवारी आढळले 2.08 लाख नवीन संक्रमित, तर 2.95 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाईट बाब म्हणजे मंगळवारी 4159 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

मंगळवारी देशभरात नवीन संक्रमितांमध्ये थोडी वाढ पाहण्यात आली. मंगळवारी देशात 2 लाख 8 हजार 714 कोरोना संक्रमितांची नोंद झाली. यात, यापूर्वी, सोमवारी कोरोना संक्रमितांचा आकडा 2 लाखांपेक्षा कमी झाला होता. दिलासादायक बाब म्हणजे, मंगळवारी 2 लाख 95 हजार 85 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशातील मृतांचा आकड्याने पुन्हा चिंता वाढवली आहे. मागील 24 तासात देशभरात 4,159 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मे महिन्यातील 25 पैकी 13 दिवस, दररोज मृतांचा आकडा चार हजारांच्या पुढे आहे. यापूर्वी, 7 मे रोजी 4,233, 8 मे 4,092, 11 मे 4,198, 12 मे 4,128, 13 मे 4,000, 15 मे 4,077, 16 मे 4,098, 17 मे 4,334, 18 मे 4,529, 20 मे 4,209, 21 मे 4,194 आणि 23 मे रोजी 4,454 मृत्यू झाले.

देशातील कोरोना महामारीची आकडेवारी

  • मंगळवारी नवीन संक्रमित आढळले: 2.08 लाख
  • मंगळवारी ठीक झालेली रुग्णसंख्या: 2.95 लाख
  • मंगळवारी झालेले मृत्यू: 4,159
  • एतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.71 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.43 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.11 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 24.90 लाख
बातम्या आणखी आहेत...