आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 30th May

कोरोना देशात:शनिवारी 1.65 लाख नवीन संक्रमितांची नोंद, तर 3,463 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासादायक बाब म्हणजे 2.64 लाख रुग्ण ठीक झाले
  • मागील दहा दिवसांत 27.40 लाख रुग्णांची कोरोनावर मात

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत कमी होताना दिसत आहे. शनिवारी देशभरात 1 लाख 65 हजार 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हा आकडा मागील 47 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 12 एप्रिलला 1 लाख 60 हजार 854 रुग्ण आढळले होते.

दरम्यान, आजही मृतांचा आकडा चिंताजनक आहे. मागील 24 तासात देशभरात 3,463 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे 2 लाख 64 हजार 342 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मृतांच्या वाढत्या आकड्यादरम्यान होत असलेल्या रिकव्हरी रेटही वाढत आहे. मागील काही दिवसांपासून देशात सरासरी दोन लाख रुग्ण दररोज ठीक होत आहेत. मागील दहा दिवसात देशात 27.40 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळेच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.

देशातील कोरोना आकडेवारी

  • शनिवारी नवीन संक्रमित आढळले: 1.65 लाख
  • शनिवारी ठीक झालेले रुग्ण: 2.64 लाख
  • शनिवारी झालेले मृत्यू: 3,463
  • आतापर्यंतचे संक्रमित रुग्ण: 2.78 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 2.54 करोड़
  • एकूण मृत्यू: 3.25 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 21.09 लाख
बातम्या आणखी आहेत...