आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:​​​​​​​रिकव्हरीनंतर येत असलेल्या मानसिक समस्यांसाठी केंद्राने हेल्पलाइन नंबर केला जारी; महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी अॅक्टिव्ह रुग्ण वाढले

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात रविवारी 11 हजार 519 नवीन रुग्ण आढळले.

कोरोनातून बरे झाल्यानंतर मोठ्या संख्येत लोक मानसिक समस्यांचा सामना करत आहेत. झोप न येणे, झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल, आरोग्य समस्या वाढणे, चिडचिड होणे, आम्ली पदार्थांचे सेवन वाढणे अशा समस्या येत आहेत. तुम्हाला या समस्या येत असतील तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या विशेषज्ञांना संपर्क करु शकता. केंद्र सरकारने यासाठी एक हेल्पलाइन जारी केली आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजुबाजूच्या लोकांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्ही 080-46110007 वर कॉल करु शकता.

दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी अॅक्टिव्ह केस वाढल्या. गेल्या 24 तासांच्या आत येथे 2,505 नवीन रुग्ण आढळले, तर केवळ 1670 लोक रिकव्हर झाले. 40 संक्रमितांचा मृत्यू झाला. आता पर्यंत राज्यात 20 लाख 26 हजार 399 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 19 लाख 29 हजार 5 लोक बरे झाले आहेत. तर 51 हजार 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 हजार 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

24 तासांच्या आत 11 हजार रुग्ण आढळले
देशात रविवारी 11 हजार 519 नवीन रुग्ण आढळले. 11 हजार 863 लोक रिकव्हर झाले आणि 116 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 7 लाख 58 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. दिलासादायक म्हणजे यामधून 1 कोटी 4 लाख 33 हजारांपेक्षा जास्त लोक बरेही झाले आहेत. 1 लाख 54 हजार 428 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 1 लाख 68 हजार 704 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.