आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:देशात कोरोनामुळे आतापर्यंत 162 डॉक्टर्स, 107 नर्स आणि 44 आशा कर्मचाऱ्यांनी गमावले प्राण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत कोरोनाचे 1.07 कोटी प्रकरणे समोर आले आहेत.

देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 162 डॉक्टर्स, 107 नर्स आणि 44 आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे केंद्र सरकारने आज संसदेत सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लेखी स्वरुपात ही माहिती दिली. हे सर्व लोक कोरोना रुग्णांवर उपचार आणि त्यांची ओळख पटवण्याचे काम करत होते.

सोमवारी 8,579 नवीन रुग्ण आढळले

देशात सोमवारी कोरोना संक्रमणाचे 8,579 प्रकरणे समोर आले. 13,443 रुग्ण बरे झाले आणि 94 रुग्णांचा मृत्यू झाला. जीव गमावणाऱ्यांचा हा आकडा गेल्या 271 दिवसांमधून सर्वात कमी आहे. यापूर्वी 6 मे रोजी 96 संक्रमितांनी जीव गमावला होता. दिलासादायक म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 12 राज्य आणि तीन केंद्र शासित प्रदेशांमध्ये या महामारीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. सर्वात जास्त 27 मृत्यू महाराष्ट्र आणि यानंतर 17 केरळमध्ये झाले. या दोनच राज्यांमध्ये 10 पेक्षा जास्त जणांनी जीव गमावला.

देशात आतापर्यंत कोरोनाचे 1.07 कोटी प्रकरणे समोर आले आहेत. यामधून 1.04 कोटी रुग्ण बरेही झाले आहेत.1.54 लाख संक्रमितांचा मृत्यू झाला आहे तर 1.60 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

मृत्यूच्या बाबतीत जगात 18 व्या क्रमांकावर
भारत आता रोज होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत जगात 18 व्या क्रमांकावर गेला आहे. सध्या सर्वात जास्त मृत्यू अमेरिका, जर्मनी, ब्राझील, मॅक्सिको, फ्रान्स, रशिया, ब्रिटन सारख्या देशांमध्ये होत आहेत. भारतामध्ये संक्रमण सध्या इतर मोठ्या देशांच्या तुलनेत नियंत्रणात आहे. येथे प्रत्येक दिवशी 8 ते 15 हजारांच्या जवळपास प्रकरणे आढळत आहेत. तर अमेरिका, फ्रान्स, रशिया, ब्रिटनमध्ये 20 हजारांपेक्षा 1.25 लाख नवीन रुग्ण आढळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...