आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोना:देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 11 लाख पार, प्रमाणात 1.2% घट; आतापर्यंत 17.23 लाख प्रकरणे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात शुक्रवारी 764 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू, आतापर्यंत एकूण 36 हजार 551 रुग्णांचा बळी
  • शुक्रवारी सर्वात जास्त आंध्र प्रदेशात 10,376 केस आढळले, महाराष्ट्रात 10,320 रुग्ण आढळले

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 17 लाख पार झाला आहे. सलग पाचव्यांदा दोन दिवसांत एक लाख रुग्ण आढळले. यासोबत रुग्णसंख्या 17 लाख हजार 335 झाली आहे.

या दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील 11 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 11 लाख 21 हजार 905 लोक बरे झाले. तर 36 हजार 838 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. लॉकडाउनदरम्यान हा दर 3.35% होता आता तो कमी होऊन 2.15% झाला आहे.

दिल्ली सीरो सर्व्हेचा दुसरा टप्पा सुरू

दिल्लीत आजपासून सीरो सर्व्हेचा दुसरा टप्प्या सुरू झाला आहे. हा सर्व्हे 1 ते 5 ऑगस्टपर्यंत चालेल. या दरम्यान सर्व 11 जिल्ह्यांत 15 हजार नमुने गोळा केले जातील. राज्य सरकारने याआधी 27 जून ते 10 जुलै दरम्यान पहिला सीरो सर्व्हे केला होता. त्यावेळी 20 हजार नमुने गोळा केले होते. सीरो सर्व्हेमुळे समजते की, कोणत्या लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित होत आहेत. म्हणण्याचा अर्थ- एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. अशा व्यक्तीच्या शरीरात 5-7 दिवसांच्या आत आपोआप अँटीबॉडी तयार होऊ लागतात, जे शरीरात विषाणू वाढू देत नाहीत. याला हर्ड इम्युनिटी म्हणतात.

कोरोनाव्हायरस नियंत्रित करण्यासाठी सर्व राज्यांनी दिल्ली मॉडेल स्वीकारले पाहिजे

केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी म्हणाले की, कोरोनाव्हायरस नियंत्रित करण्यासाठी सर्व राज्यांनी दिल्ली मॉडेल स्वीकारले पाहिजे. ते म्हणाले, 'मी तेलंगणा सरकारशी तपासणी, संक्रमित लोकांचा शोध घेण्यासाठी आणि उपचारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बोलत आहे. तेलंगणात चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. तपासणीची संख्या जितकी जास्त असेल तितक्या वेगाने रोग नियंत्रणात आणला जाईल. आपणास माहित आहे की दिल्लीत बरे होण्याचा दर 84% आहे. तेथे कोरोनाविरोधात खूप चांगले काम झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...