आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये जवळपास 4 लाख केस कमी; 5 हजार मृत्यूही कमी झाले, रिकव्हरी रेट आता 96.1%

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 1.49 लाख झाली आहे.

देशात कोरोना केसमध्ये सातत्याने घट दिसत आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये जवळपास 4 लाख कमी नवीन प्रकरणे समोर आले आणि मृत्यूमध्येही 5 हजारांची विक्रमी घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये देशात एकूण 12.33 लाख रुग्ण आढळले होते. 13.45 रुग्ण पूर्णपणे बरे झाले होते आणि जवळपास 15 हजार लोकांनी प्राण गमावले होते. या दरम्यान 1.27 लाख अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहेत.

तर डिसेंबरमध्ये संक्रमित आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा 7.85 लाख राहिला. या दरम्यान 9.48 लाख लोक रिकव्हर झाले आणि जवळपास 10.8 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसमध्ये 1.74 लाखांची घट झाली आहे.

ओव्हरऑल रिकव्हरी रेटविषयी बोलायचे झाले तर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 99 लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. अशा प्रकारे देशाचा रिकव्हरी रेट आता 96.1% झाला आहे.

देशात आतापर्यंत 1.02 कोटी प्रकरणे
गेल्या 24 तासांमध्ये देशात 19 हजार 45 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. 22 हजार 23 लोक बरे झाले आहे आणि 244 जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत. देशात आतापर्यंत 1.02 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 2.52 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 98.81 लाख लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 1.49 लाख झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...