आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:टेस्टिंगचा आकडा 15 कोटींच्या पार, पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन 6.47 झाला, यामध्ये दररोज घट होत आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 97.63 लाख केस आल्या आहेत.

देशातील कोरोना चाचणीने 15 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यासह, पॉजिटिव्हिटी दर देखील 6.47% पर्यंत खाली आला आहे. तो दररोज कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 27 हजार 699 नवीन प्रकरणे आली, 32 हजार 986 रुग्ण बरे झाले आणि 356 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचा हा आकडा 22 जूननंतर म्हणजे 170 दिवसात सर्वात कमी आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने अॅक्टिव्ह केस कमी होत आहेत. आता 3.71 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात आतापर्यंत 97.63 लाख केस आल्या आहेत. यामधून 92.47 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 1.41 लाख संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

मृतांच्या आकड्यांमध्ये घट
डिसेंबरच्या या 8 दिवसांमध्ये आतापर्यंत 3700 पेक्षा जास्त लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान गेल्या 3 महिन्यांच्या आत मृतांच्या ग्राफमध्ये सातत्याने घट होत आहे. सप्टेंबरमध्ये 32 हजार 246 लोकांचा मृत्यू झाला होता. अक्टोबरमध्ये हा आकडा कमी होऊन 22 हजार 344 झाला आहे. नोव्हेंबरमध्ये 15 हजार 17 लोकांनी जीव गमावला आहे.

इन देशों में सबसे ज्यादा एक्टिव केस

1.देशअॅक्टिव्ह केस
1.अमेरिका62.12 लाख
2.फ्रान्स20.81 लाख
3.इटली7.37 लाख
4.ब्राझील6.43 लाख
5.बेल्जियम5.36 लाख
6.रशिया4.88 लाख
7.तुर्की4.36 लाख
8.यूक्रेन3.80 लाख
9.भारत3.78 लाख
10.जर्मनी3.34 लाख
Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser