आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आठवड्यात दुसऱ्यांदा एक हजारांपेक्षा जास्त केस झाल्या कमी, टेस्टिंगचा हा आकडा 18 कोटींच्या पार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात टेस्टिंगचा आकडा 18 कोटींच्या पार पोहोचला आहे.

व्हॅक्सीनेशन सुरू होण्याच्या आनंदाच्या बातमी दरम्यान 24 तासांमध्ये केवळ 856 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या आहे. हे आठवड्यात दुसऱ्यांदा आहे. जेव्हा एक हजारांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केस कमी झाल्या. या महिन्यात 4 जानेवारीला सर्वात जास्त 13 हजार आणि 6 जानेवारीला सर्वात कमी 547 अॅक्टिव्ह केस कमी झाल्या होत्या.

तर देशात टेस्टिंगचा आकडा 18 कोटींच्या पार पोहोचला आहे. येथे आतापर्यंत 18.02 कोटींपेक्षा जास्त टेस्ट करण्यात आलेले आहेत. पॉझिटिव्ह रेटही 5.8% नोंदवण्यात आला आहे. म्हणजेच प्रत्येक 100 मध्ये केवळ 5 किंवा 6 लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी होत आहे.

आतापर्यंत 1.04 कोटी केस
काल देशात 18 हजार 820 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 19 हजार 460 लोक बरेही झाले आहेत. तर 213 लोकांनी जीव गमावला आहे. यासोबतच आता संक्रमितांचा आकडा एक कोटी 4 लाख 51 हजार 346 पर्यंत पोहोचला आहे यामध्ये एक कोटी 75 हजार 395 लोक बरे झाले आहेत आणि एक लाख 51 हजार 48 लोकांनी जीव गमावला आहे देशातील अॅक्टिव्ह केसचा आकडा आता 2 लाख 20 हजार 591 पर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रात शनिवारी 3581 लोक कोरोना संक्रमित आढळले. 2401 लोक रिकव्हर झाले आणि 57 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19 लाख 65 हजार 556 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 18 लाख 61 हजार 400 लोक बरे झाले आहेत. तर 50 हजार 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 52 हजार 960 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...